GT vs RR Final | गुजरातचा राजस्थानवर 7 विकेट्सने विजय, विजेतेपदावर कोरलं नाव

राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवत गुजरातने आयपीएल विजेतेपद  (IPL 2022 Final) पटकावलंय.

Updated: May 29, 2022, 11:57 PM IST
GT vs RR Final | गुजरातचा राजस्थानवर 7 विकेट्सने विजय, विजेतेपदावर कोरलं नाव title=

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने (Gujrat Titans)  आपल्या पदार्पणातील मोसमात धमाका केलाय. राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवत गुजरातने आयपीएल विजेतेपद  (IPL 2022 Final) पटकावलंय. राजस्थानने गुजरातला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 11 बॉलआधी पूर्ण केलं. (ipl 2022 final gt vs rr gujrat titans beat rajsthan royals by 7 wickets and win maiden title)

गुजरातकडून शुबमन गिलने सर्वाधिक नाबाद 45 धावा केल्या. कॅप्टन हार्दिक पंड्याने 34 रन्स केल्या. तर डेव्हिड मिलरने नाबाद 32 धावांचं योगदान दिलं. तर राजस्थानकडून ट्रेन्ट बोल्ट, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.  

दरम्यान त्याआधी राजस्थानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांसमोर जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला विशेष काही करता आलं नाही. 

या दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली. मात्र मोठी खेळी करण्यात या दोघांना अपयश आलं. गुजरातने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 130 धावा केल्या.  

बटलरने राजस्थानकडून सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. तर यशस्वीने 22 रन्सचं योगदान दिलं. तर गुजरातकडून कॅप्टन हार्दिक पंड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. साई किशोरने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 
 
राजस्थान रॉयल्सची शिलेदार : संजू सॅमसन (कर्णधार-विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जायसवाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय. 

गुजरातची प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल आणि मोहम्मद शमी.