IPL 2022 | वीरेंद्र सेहवागला वडापाव महागात पडला, नक्की काय झालं?

वीरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) वडापाव (Vadapav) चांगलंच महागात पडला आहे.

Updated: Apr 7, 2022, 08:35 PM IST
IPL 2022 | वीरेंद्र सेहवागला वडापाव महागात पडला, नक्की काय झालं? title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी आक्रमक बॅट्समन वीरेंद्र सेहवाग (virender Sehwag) सोशल मीडियावर सक्रिय असतो. सेहवागने केलेल्या एका ट्विटमुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 14 व्या सामन्यात कोलकाताने (KKR) मुंबईवर (MI) दणदणीत विजय मिळलवला. सेहवागने मुंबईच्या या पराभवानंतर एक गंमतशीर ट्विट केलं. या ट्विटमध्ये 'वडा पाव' (Vadapav) असा उल्लेख केला होता. सेहवागला वडापावचा उल्लेख करणंही चांगलंच महागात पडलं. सेहवागला वडापावच्या उल्लेखावरुन मुंबई आणि रोहितच्या चाहत्यांनी जोरदार ट्रोल केलं. दरम्यान यानंतर सेहवागने चाहत्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. (ipl 2022 kkr vs mi virender sehwag give advice cool down to rohit sharma fans after netizens trolled him over to vadapav tweet)

सेहवाग काय म्हणाला? 

पॅट कमिन्सच्या वादळी खेळीच्या जोरावर बुधवारी 7 एप्रिलला कोलकाताने मुंबईवर 5 विकेट्सने विजय मिळवला. सेहवागने मुंबईच्या पराभवानंतर ट्विट केलं. तोंडातून घास हिसकावला, माफ करा वडा पाव हिसकावला. पॅट कमिन्स, जोरदार खेळीपैकी एक... 15 चेंडूत 56 धावा", असं ट्विट रोहितने केलं होतं.

सेहवागने 'वडा पाव'चा उल्लेख करत मुंबईवर निशाणा साधला. सेहवागच्या ट्विटचा अर्थ असा होता की, कोलकाताने मुंबईच्या तोंडून 'वडा पाव' हिसकावला. 

सेहवागच्या या ट्विटमुळे वादाला तोंड फुटलं. मुंबई आणि रोहितचे चाहते संतापले. सेहवागला टीकेचा सामना करावा लागला. या टीकेच्या काही तासांनंतर सेहवागने या ट्विटबाबत दुसरं ट्विट करत स्पष्टीकरण दिलं. 

"वडा पावचा संदर्भ हा मुंबईसाठी आहे.  मुंबई शहर वडापावसाठी ओळखलं जातं. रोहितच्या चाहत्यांना थंड व्हा. मी तुमच्यापैकी अधिकांश लोकांपेक्षा जास्त रोहितच्या बॅटिंगचा चाहता आहे", असं ट्विट सेहवागने केलं.