IPL 2022 Mega Auction : दिल्ली कॅपिटल्समधून 'हा' मॅच विनर खेळाडू होणार बाहेर

धडाकेबाज फलंदाज दिल्ली कॅपिटल्स सोडणार, ऋषभ पंत ठरणार कारण?

Updated: Oct 28, 2021, 10:53 PM IST
IPL 2022 Mega Auction : दिल्ली कॅपिटल्समधून 'हा' मॅच विनर खेळाडू होणार बाहेर

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) दमदार कामगिरी केली. 14 पैकी 10 लीग सामने जिंकून दिल्लीने गुणतालिकेत (Point Table) अव्वल स्थान गाठले. पण प्लेऑफमध्ये नशीबाने दिल्लीची साथ दिली नाही आणि अंतिम फेरीत पोहचण्याचं ध्येय अपूर्णच राहिलं.

दिल्ली कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार?

आयपीएलचा चौदावा हंगाम आता मागे पडला आहे, दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ आता नव्या हंगामात खेळाडूंच्या मेगा ऑक्शनसाठी (IPL 2022 Mega Auction) सज्ज होतोय. अशात दिल्ली कॅपिटल्सच्या समर्थकांना प्रश्न पडला आहे की, कोणत्या खेळाडूंना दिल्लीच्या संघात कायम ठेवलं जाणार.

श्रेयस अय्यरबाबत मोठा निर्णय?

दिल्ली कॅपिटल्सच्या गोठातून एक मोठी बातमी समोर येतेय. आयपीएल 2020 मध्ये आपल्या नेतृत्वाखाली संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचवणारा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पुढच्या हंगामात संघाबरोबर खेळताना दिसणार नाही.

अय्यर कर्णधारपदाच्या शर्यतीत

आयपीएल 2020 मध्ये दिल्ली संघाचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरला 2021 च्या हंगामात कर्णधारपदावरुन दूर करण्यात आलं. पण मिळालेल्या माहितीनुसार श्रेय्यस अय्यरला संघाचं नेतृत्व करायचं आहे. आयपीएल 2021 मध्ये दिल्लीची धुरा ऋषभ पंतने सांभाळली. पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने दमदार कामगिरी केली. त्यामुळे दिल्ली संघाचे मालक पंतला कर्णधारपदावरुन हटवण्याची शक्यता फारच कमी आहे. 

नवे संघ कर्णधारपदाच्या शोधात

आयपीएल 2022 मध्ये अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नविन संघांचा समावेश झाला आहे. शिवाय राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सचे संघही कर्णधार बदलण्याच्या मनस्थितीत आहेत. तसंच विराट कोहलीही आरसीबीच्या कर्णधारपदावरुन दूर झाला आहे. त्यामुळे श्रेय्यस अय्यरला या संघांकडून कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते.