मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग दुसऱ्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे. राजस्थानने मुंबईवर 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या दुसऱ्या पराभवामुळे कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) संतापला आहे. रोहितने टीममध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. (ipl 2022 mi vs rr mumbai indians captain rohit sharma give reaction after lost match against rajsthan royals)
रोहित काय म्हणाला?
"मला वाटतं की राजस्थानने चांगली बॅटिंग करत 193 धावा केल्या. बटलरने शानदार खेळी केली. आम्ही बटलरला आऊट करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण मला वाटतं या पीचवर 193 धावांचा पाठलाग करायला हवा होता. विशेष म्हणजे 7 ओव्हरमध्ये 70 रन्सची गरज असताना. पण असं प्रकार घडतात आणि ही फक्त स्पर्धेची सुरुवात आहे. आम्ही यातून धडा घेऊ शकतो", असं रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला.
बुमराहचं कौतुक
"जसप्रीत बुमराह आणि मिल्सने चांगली बॉलिंग केली. तिलक वर्माने शानदार बॅटिंग केली. इशानची फलंदाजी उत्कृष्ट होती. दोघांपैकी कोणीही शेवटपर्यंत फलंदाजी केली असती तर आव्हान इतकं अवघड झालं नसतं", अशी खंत रोहितने बोलून दाखवली.
सूर्यकुमार यादवबाबत काय म्हणाला?
"सूर्यकुमार यादव आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो फिट झाल्यावर टीममध्ये येईल. पण त्याने बोटाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरावाअशी आमची इच्छा आहे", असं रोहित म्हणाला.