Allah Mohammad IPL 2023 Auction: फीफा वर्ल्डकप 2022 (Fifa world cup) ची सगळीकडे चर्चा सुरु असताना क्रिकेट चाहत्यांसाठी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. 23 डिसेंबर रोजी इंडियन प्रीमियर लीग-2023 साठी असणारं मिनी ऑक्शन (PL 2023 Auction) होणार आहे. बुधवारी ज्या खेळाडूंची नावं ऑक्शनमध्ये समाविष्ट आहेत, असा सर्व खेळाडूंची लिस्ट समोर आली आहे. यामध्ये काही युवा खेळाडूंची नावं असून अनेक टीमची या खेळाडूंवर नजर असणार आहे.
अफगाणिस्तानचा 15 वर्षांचा अल्लाह मोहम्मद (Allah Mohammad) याने आयपीएलच्या ऑक्शनमध्ये स्वतःचं नाव दिलं आहे. त्याची बेस प्राईज ही 20 लाख रूपये आहे. जेव्हापासून ऑक्शन लिस्टमध्ये त्याचं नाव आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर त्याच्या नावाची चर्चा सुरु आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे इतक्या कमी वयात तो दिग्गज खेळाडूंसमोर काय कमाल दाखवणार.
अवघ्या 15 वर्षांचा अल्लाह मोहम्मदचा जन्म 15 जुलै 2007 साली अफगाणिस्तामध्ये झाला. अल्लाह मोहम्मद यावर्षीच्या आयपीएल ऑक्शनमध्ये समाविष्ट होणार असून तो सर्वात तरूण खेळाडू आहे. त्याने बिग बॅश लीगमध्ये त्याचं नाव दिलं होतं, मात्र त्याला कोणी खरेदीदार मिळाला नाही.
6 फीट, 2 इंच इतकी उंची असलेला अल्लाह मोहम्मद ऑफ स्पिनर (Afghanistan Spinner ) आहे, जो त्याच्या फिरकीने विरोधी टीमची दाणादाण उडवण्याच्या हेतूने आयपीएलमध्ये येणार आहे. अफगाणिक्तानच्या जुरमत विभागातून अल्लाह मोहम्मद याने वेगवान गोलंदाज म्हणून स्वतःच्या करियरला सुरुवात केली होती.
अल्लाह मोहम्मदने सांगितलं की, त्याने टेनिस बॉलच्या मदतीने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यानंतर तो स्पिन गोलंदाजी करू लागला आणि त्याची एक्शन देखील चांगली होऊ लागली. आता तो प्रोफेशनल क्रिकेट खेळतोय. अफगाणिस्तानचा हा युवा स्पिनर टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडू रविचंद्रन अश्विनला स्वतःचा हिरो मानतो.
आयपीएलच्या आगामी 16 व्या सिझनसाठी 23 डिसेंबरला कोच्चीत (Kocchi) मिनी ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने खेळाडू शॉर्टलिस्टेड केलं आहे. या मिनी ऑक्शनसाठी एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती. आयपीएलने यापैकी 405 खेळाडूंनी निवड केली आहे. आयपीएलने ट्विट करत ही यादी जाहीर केली आहे. सुरुवातीला प्रारंभिक यादीत 10 संघांपैकी 369 खेळाडूंची निवड करण्यात आली. मात्र त्यानंतर 10 संघांनी 36 अतिरिक्त खेळाडूंचा समावेश करण्याचा आग्रह केला. यानंतर या खेळाडूंची नावं अंतिम यादीत जोडली गेली.
23 डिसेंबरला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी मिनी ऑक्शनला सुरुवात होणार आहे. या ऑक्शनमध्ये 405 खेळांडूमध्ये 273 भारतीय तर 132 परदेशी खेळाडूंची समावेश आहे. तर 4 असोसिएट राष्ट्राच्या खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे. या ऑक्शनमध्ये 119 कॅप्ड आणि 282 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. कॅप्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले खेळाडू.