IPL 2023: जिलेबी-फाफडा पाहून Ben Stokes च्या तोंडाला सुटलं पाणी! Video व्हायरल

पहिल्या सामन्यापूर्वी चेन्नईच्या खेळाडू जिलेबी-फाफडावर तुटुन पडलेले दिसले. यावेळी कर्णधार महेंद्र सिंग धोनीसोबत सगळे खेळाडू खाण्यावर तुटून पडले. यावेळी बेन स्टोक्सच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. धोनीने देखील याचा आनंद घेतला.

Updated: Mar 31, 2023, 05:00 PM IST
IPL 2023: जिलेबी-फाफडा पाहून Ben Stokes च्या तोंडाला सुटलं पाणी! Video व्हायरल title=

IPL 2023: आयपीएल (IPL 2023) सुरु होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. देशभरातील कोट्यवधी चाहते या दिवसाची वाट पाहत होते. संध्याकाळी 7 वाजता आयपीएलचा थरार सुरु होणार आहे. यामध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये रंगणार आहे. अशातच सामना सुरु होण्यापूर्वी सीएसकेचा खेळाडू बेन स्टोक्स एका वेगळ्याच अंदाजात दिसून आला आहे. 

जिलेबी-फाफडावर तुटून पडला बेन स्टोक्स

पहिल्या सामन्यापूर्वी चेन्नईच्या खेळाडू जिलेबी-फाफडावर तुटुन पडलेले दिसले. यावेळी कर्णधार महेंद्र सिंग धोनीसोबत सगळे खेळाडू खाण्यावर तुटून पडले. यावेळी बेन स्टोक्सच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. धोनीने देखील याचा आनंद घेतला. अनेकदा धोनीही त्याचं संपूर्ण फिटनेस विसरून स्ट्रिट फूडवर ताव मारताना दिसतो.

एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने चारवेळा विजेतेपद पटकावलंय. यावेळी संपूर्ण टीम मैदानावर मेहनत घेतेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीचं हे शेवटचं वर्ष असणार आहे. त्यामुळे यावर्षी सीएसके हे विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे.

कशी असेल दोन्ही टीमची प्लेईंग 11

आज संध्याकाळी साडेसात वाजता गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सच्या यांच्यामध्ये आयपीएलच्या 16 व्या सिझनचा पहिला सामना रंगणार आहे. दरम्यान यामध्ये नेमके कोणते खेळाडू या सामन्यात असतील, कोणाला वगळं जाईल यासंदर्भातील चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. 

दोन्ही टीम्सची संभाव्य प्लेईंग 11

चेन्नई सुपरकिंग्स

ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉन्वे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर, कर्णधार), ड्वेन प्रिटोरियस, दीपक चाहर, सिमरजीत सिंह

गुजरात टायटन्स

शुभमन गिल, केन विलियम्सन, श्रीकर भरत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, आर साई किशोर, राशिद खान, यश दयाल, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी

दोन्ही टीम्सचा इतिहास

तापर्यंत गुजरात आणि चेन्नईचे संघ केवळ 2 वेळा आमने-सामने आलेत. चेन्नई आणि गुजरातदरम्यान झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातनेच विजय मिळवला आहे. चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये गुजरातने 3 विकेट्सने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यामध्ये 7 विकेट्सने जिंकला होता.