IPL 2023: धोनीच्या स्वप्नाचा होणारा चुराडा? आयपीएलपूर्वी माहीचा हुकमी एक्का 'आऊट'

Chennai Super Kings: IPL 2023 च्या आधी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. धोनीला आयपीएल जिंकवून देणारा खेळाडू झाला 'आऊट'

Updated: Feb 14, 2023, 05:29 PM IST
IPL 2023: धोनीच्या स्वप्नाचा होणारा चुराडा? आयपीएलपूर्वी माहीचा हुकमी एक्का 'आऊट' title=
MS Dhoni csk

IPL 2023 Chennai Super Kings: मागील काही महिन्यांपासून धोनी आयपीएल (IPL 2023) खेळणार नाही की नाही? अशी चर्चा क्रिडाविश्वात सुरू होती. त्यावर धोनीने (MS Dhoni) उत्तर दिलंय. आगामी आयपीएल सामन्यात धोनी खेळणार असल्याने चेन्नईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता धोनीच्या चेन्नईला (CSK) मोठा धक्का बसलाय. त्यामुळे आता भारताच्या यशस्वी कॅप्टनच्या स्वप्नांचा चुराडा होणार की काय? अशी चर्चा होताना दिसत आहे. त्याला कारण ठरलंय धोनीचा हुकमी एक्का... (IPL 2023 Chennai Super Kings dealt injury blow, Kyle Jamieson doubtful for IPL with back stress fracture MS Dhoni in tension)

न्यूझीलंड संघाला16 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशातच वेगवान गोलंदाज काइल जॅमीसन (Kyle Jammieson)  या मालिकेतून बाहेर झालाय. पुन्हा एकदा त्याला स्ट्रेस फ्रॅक्चरची समस्या असल्याचं सांगितलं जातंय. जून 2022 मध्ये तो शेवटचा बाहेर खेळताना दिसला होता. तो आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचाही एक भाग आहे. काइल जॅमीसन पुन्हा एकदा दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहू शकतो, अशी चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे आता कॅप्टन धोनीला देखील चिंता लागून राहिली आहे.

गॅरी स्टेड म्हणतात...

न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड (Gary Stead) यांनी यावर वक्तव्य केलंय. काइल जॅमीसनसाठी (Kyle Jammieson Injury) हे खूप कठीण जाणार आहे. कारण त्याने पुन्हा मैदानात उतरण्यासाठी खूप मेहनत घेतली. गतवर्षी काईलला इंग्लंडसमोर दुखापत झाली होती. त्यानंतर आता त्याला बरीच मेहनत करावी लागेल, असं गॅरी स्टेड म्हणतात. जॅमीसनने आत्तापर्यंत 9 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 9 विकेट घेतल्यात. त्यामुळे आता गोलंदाजीची धुरा महिष टीक्षाना (Maheesh Theekshana), दीपक चहर (Deepak Chahar), राजवर्धन हंगर्रगेकर (Rajvardhan Hangargekar) यांच्या खांद्यावर असेल.

आणखी वाचा - MS Dhoni : चेन्नईचा 'थाला' IPL 2023 खेळणार नाही?, सर्वात मोठी अपडेट समोर!

चेन्नईच्या विजयाचा महोरक्या धोनी - 

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या यशात सर्वात मोठा वाटा आहे तो कर्णधार एम एस धोणीचा. धोणीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने (CSK) तब्बल चार वेळा जेतेपद पटकावलं आहे. 2010, 2011, 2018 आणि 2021 अशा चार वेळा चेन्नईने आयपीएल स्पर्धा जिंकण्याची कमाल केली आहे. विशेष म्हणजे 2008 च्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत चेन्नई संघाचा एमएस धोणी हा एकमेव कर्णधार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत पोहोचलेला चेन्नई हा एकमेव संघ आहे.