IPL 2023: मोहम्मद शमीने घेतला क्लीन बोल्ड, पहिल्याच सामन्यात नावावर मोठा रेकॉर्ड

IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला भव्यदीव्य उद्घाटनाने सुरुवात झाली आणि त्यानंतर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान सलामीचा सामना खेळवला जातोय. पहिल्याच सामन्यात एक मोठा रेकॉर्डची नोंद झालीय. 

Updated: Mar 31, 2023, 09:04 PM IST
IPL 2023: मोहम्मद शमीने घेतला क्लीन बोल्ड, पहिल्याच सामन्यात नावावर मोठा रेकॉर्ड title=

GT vs CSK: हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्सदरम्यान (Chennai Super Kings) आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा (IPL 2023) पहिला सामना खेळवला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षकांच्या गर्दीत हा सामना खेळवला जात आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पहिल्याच सामन्यात टॉस का बॉस ठरला. टॉस जिंकून गुजरातने पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीलाच गुजरातचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) मोठा रेकॉर्ड नावावर केला.

शमीची दमदार गोलंदाजी
गुजरातने पहिली गोलंदाजी घेतल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने चेंडू मोहम्मद शमीच्या हाती सोपवला. शमीने दमदार सुरुवात केली. पहिल्या षटकात शमीने केवळ दोन धावा दिल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर शमीने चेन्नईला पहिला धक्का दिला. शमीने चेन्नईचा सलामीचा फलंदाज डेवोन कॉनवेला क्लीन बोल्ड केलं. शमीने टाकलेला चेंडू इतका वेगवान होता की कॉनवे काही कळायच्या आतच त्याच्या दांड्या गुल झाल्या होत्या. कॉनवे अवघ्या एका धावेवर बाद झाला.

शमीच्या नावावर रेकॉर्ड
मोहम्मद शमीने डेवोन कॉनवेला बाद करण्याबरोबरच त्याच्या नावावर एक मोठा रेकॉर्ड जमा झालाय. शमीने आयपीएलमध्ये तब्बल 100 विकेटचा टप्पा पूर्ण केला. 94 सामन्यात शमीने ही कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये शंभर वीकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमीचा समावेश झाला आहे. 

चेन्नई प्लेईंग-11
डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चाहर आणि राजवर्धन हंगरगेकर.

गुजरात टाइटंस प्लेइंग 11 
ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, केन विलियमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल, यश दयाल आणि अल्जारी जोसेफ