IPL 2023: चेन्नईपुढे गुजरातचं आव्हान, पाहा प्लेइंग 11; पहिल्या दिवशी चमकणार कोण?

IPL 2023 CSK vs GT: आयपीएलच्या (IPL) नव्या आणि तितक्याच रंजक पर्वाची सुरुवात अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपलेली आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या पहिल्या सामन्याच चेन्नई आणि गुजरात (CSK vs GT) हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मागील वर्षी आयपीएल गाजवणाऱ्या गुजरातच्या संघाकडून यंदाची सुरुवातही तितकीच दणक्यात करण्याचा मानस असेल. तर चेन्नईही त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी तोडीस तोड खेळाडू मैदानात पाठवताना दिसणार आहे. त्यामुळं आता या सामन्यात बाजी कोण मारणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 

Updated: Mar 31, 2023, 12:30 PM IST
IPL 2023: चेन्नईपुढे गुजरातचं आव्हान, पाहा प्लेइंग 11; पहिल्या दिवशी चमकणार कोण?  title=
IPL 2023 News fist match chennai Superkings CSK vs gujarat titans GT Latest Marathi news

IPL 2023 CSK vs GT Playing XI: आयपीएलच्या (IPL) नव्या आणि तितक्याच रंजक पर्वाची सुरुवात अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपलेली आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या पहिल्या सामन्याच चेन्नई आणि गुजरात (CSK vs GT) हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मागील वर्षी आयपीएल गाजवणाऱ्या गुजरातच्या संघाकडून यंदाची सुरुवातही तितकीच दणक्यात करण्याचा मानस असेल. तर चेन्नईही त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी तोडीस तोड खेळाडू मैदानात पाठवताना दिसणार आहे. त्यामुळं आता या सामन्यात बाजी कोण मारणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 

चेन्नईला टक्कर देण्यासाठी गुजरात कुणाला मैदानात उतरवणार? पाहा प्लेइंग 11 (Gujarat Titans Playing XI)

शुभमन गिल (Shubhman Gill), मॅथ्यू वेड (Wicket Keeper), केन विलियम्सन, हार्दिक पांड्या (कप्तान), अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, ओडियन स्मिथ, राशिद खान, शिवम मावी, यश दयाल, मोहम्मद शमी. 

गिलच्या हाती संघाला तगडी सुरुवात करून देण्याची जबाबदारी... 

क्रिकेट अभ्यासकांच्या मते गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये असणारा शुभमन गिल गुजरातच्या वतीनं सलामीचा फलंदाज ठरू शकतो. त्याला साथ देण्यासाठी मॅथ्यू वेडला मैदानात पाठवण्याचा निर्णय कर्णधार घेईल असंही म्हटलं जात आहे. तर, केन विलियम्सन या सामन्यात तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी येईल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

पांड्या घेऊ शकतो मोठा निर्णय... 

चेन्नईच्या संघापुढे मैदानात आलेल्या आपल्या संघाला आधार देण्यासाठी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या मोठा निर्णय घेत फलंदाजीसाठी चौथ्या स्थानावर येऊ शकतो. मधल्या फळीत येत संधाला स्थिर धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा मानस असेल. तर, राहुल तेवतियाला मागील वर्षीप्रमाणंच खालच्या स्थानावर पाठवत संघाची एक बाजू भक्कम करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. 

हेसुद्धा वाचा : IPL 2023: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; आयपीएलपूर्वी Rohit Sharma पडला आजारी!

 

गोलंदाजीत राशिदची जादू... 

Gujarat Titans कडून गोलंदाजीसाठी राशिद खानचीच चर्चा पाहायला मिळत आहे. त्याच्याशिवाय शिवम मावी, यश दलाल आणि मोहम्मद शमी त्यांच्या परीनं संघाला आधार देताना दिसतील. शामीचा आयपीएलमधील इतिहास पाहता त्याच्याकडूनही यंदा चांगल्या खेळाची अपेक्षा केली जात आहे. 

दरम्यान, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच या दुनियेतून काही लक्षवेधी वृत्तही पाहायला मिळत आहेत. स्पर्धेआधीच सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघानं कर्णधार बदलला आहे. इथून पुढं अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्यावर (Bhuvneshwar Kumar) संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी हा बदल असणार आहे.