IPL Opening Ceremony 2023:आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याला लागणार बॉलिवूडचा तडका; जाणून घ्या.. कुठे आणि कसे बघाल

IPL Opening Ceremony 2023, CSK vs GT : गुजरातमधील अहमदाबादच्या 'नरेंद्र मोदी स्टेडियम'मध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. त्याचबरोबर त्यात ग्लॅमरचा तडका जोडण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सही यात सहभागी होणार आहेत.

Updated: Mar 31, 2023, 12:48 PM IST
IPL Opening Ceremony 2023:आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याला लागणार बॉलिवूडचा तडका; जाणून घ्या.. कुठे आणि कसे बघाल

IPL Opening Ceremony 2023 Date and Time : प्रत्येक क्रिकेटप्रेमी उद्याच्या दिवसाची वाट पाहतोय. उद्यापासून म्हणजेच 31 मार्चपासून आयपीएलच्या 16 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. मात्र यंदाच्या आयपीएल ओपनिंग सेनेमनीला बॉलिवूडचाही तडका लागणार आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीं 16 व्या सिझनचं धडाक्यात स्वागत करण्यास सज्ज आहेत. 

आयपीएलचा 16व्या सिझन 31 मार्चपासून सुरू होणार आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या 'नरेंद्र मोदी स्टेडियम'मध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. त्याचबरोबर त्यात ग्लॅमरचा तडका जोडण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सही यात सहभागी होणार आहेत. जाणून घ्या IPL च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये कोणते स्टार्स दिसणार आहेत.

किती वाजता रंगणार आयपीएलची ओनपिंग सेरेमनी?

31 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता आयपीएलच्या ओपनिंग सेनेमनीला सुरुवात होणार आहे. जवळपास 45 मिनिटं ही सेरेमनी चालणार आहे.   

हे सेलिब्रिटी करणार परफॉरमन्स

बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपट अभिनेत्री तमन्ना भाटिया ग्रँड ओपनिंग सेरेमनी मध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच बॉलिवूडचा फेसम सिंग अरिजीत सिंह (Arijit Singh) देखील लाईव्ह परफॉर्म करणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कतरिना कैफ,  रश्मिका मंदाना आणि टाइगर श्रॉफ हे देखील परफॉर्म करणार आहेत. मात्र या सेलिब्रिटींच्या नावाची अजून अधिकृत नावं घोषित करण्यात आलेली नाही. 

कुठे दिसणार ओपनिंग सेरेमनी?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे प्रसारण करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर आयपीएल सामने त्याचप्रमाणे ओपनिंग सेरेमनी तुम्ही पाहू शकता. 

लाइव्ह मॅच मोफत कशी बघायची?

IPL चे स्ट्रिमींग जिओ सिनेमावर होणार आहे. या अॅपमध्ये तुम्ही लाईव्ह सामना पाहू शकता. यावेळी पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे भरण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या फोनवर Jio Cinema अॅप इन्स्टॉल करून आयपीएलचे सामने फ्रीमध्ये पाहू शकता.

31 मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार

31 मार्च म्हणजेच शुक्रवारपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या लीगला सुरुवात होणार आहे. यावेळी पहिला सामना गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये रंगणार आहे. दरम्यान गुरुवारी सर्व टीमच्या कर्णधारांचं आयपीएलच्या ट्रॉफीसोबत फोटोशूट करण्यात आलं. मात्र यावेळी मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध नव्हता.

ट्रेंडिंग न्यूज़

शिवराज्याभिषेक : शिवप्रेमींची अलोट गर्दी, महाड ते रायगड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

शिवराज्याभिषेक : शिवप्रेमींची अलोट गर्दी, महाड ते रायगड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा 5 लाखांची गुंतवणूक, व्याजापोटी 2 लाख रुपये कमवाल

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा 5 लाखांची गुंतवणूक, व्याजापोटी 2 लाख रुपये कमवाल

Mumbai AC Local: वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली; चर्चगेट AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली

Mumbai AC Local: वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली; चर्चगेट AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली

'दिघेंना पवारांमुळेच जामीन' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... तर नरेश म्हस्केंच्या आरोपाने खळबळ

'दिघेंना पवारांमुळेच जामीन' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... तर नरेश म्हस्केंच्या आरोपाने खळबळ

राज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे

राज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे

Rohit Sharma Injury : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; प्रॅक्टिसदरम्यान कर्णधार रोहितला दुखापत

Rohit Sharma Injury : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; प्रॅक्टिसदरम्यान कर्णधार रोहितला दुखापत

'सरकारी जाहिराती या दिशाभूल आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या', अजित पवारांचा हल्लाबोल

'सरकारी जाहिराती या दिशाभूल आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या', अजित पवारांचा हल्लाबोल

आताची मोठी बातमी! 'या' राज्यात आता 10 वी बोर्ड परीक्षा नसणार, 'असा' असेल नवा शैक्षणिक फॉर्म्युला

आताची मोठी बातमी! 'या' राज्यात आता 10 वी बोर्ड परीक्षा नसणार, 'असा' असेल नवा शैक्षणिक फॉर्म्युला

'या' सरकारी योजनेत मोठी टॅक्स सवलत; मिळणार लाखोंचा फायदा, असा घ्या लाभ

'या' सरकारी योजनेत मोठी टॅक्स सवलत; मिळणार लाखोंचा फायदा, असा घ्या लाभ

'त्या' 40 जणांना साधं खरचटलंही नाही; मग कसा ओढावला मृत्यू? धक्कादायक माहिती समोर

'त्या' 40 जणांना साधं खरचटलंही नाही; मग कसा ओढावला मृत्यू? धक्कादायक माहिती समोर

इतर बातम्या

राजकारणात कुणी कुणाचा दुश्मन नसतो; नारायण राणे - दीपक केसरक...

महाराष्ट्र