IPL 2023: 'दोन दिवसात ती माझ्या रुममध्ये...' शिखर धवनचं स्टिंग ऑपरेशन, धक्कादायक वक्तव्य कॅमेरात कैद

Sting Operations: आयपीएल सुरु असतानाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून खासगी आयुष्याबाबत यात दिग्गज खेळाडू व्यक्तव्य करताना दिसत आहे.

Updated: Apr 11, 2023, 08:02 PM IST
IPL 2023: 'दोन दिवसात ती माझ्या रुममध्ये...' शिखर धवनचं स्टिंग ऑपरेशन, धक्कादायक वक्तव्य कॅमेरात कैद title=

Shikhar Dhawan Viral Video: आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या चांगलाच फॉर्मात आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) झालेल्या सामन्यात शिखरने नाबाद 99 धावांची खेळी करत चाहत्यांची मन जिंकली. यादरम्यान शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओत शिखर धवन आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. 

शिखर धवनचं स्टिंग ऑपरेशन?
शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात धवन आपल्याला पुन्हा प्रेम झाल्याची कबुली देत असल्याचं दिसंतय. 2021 मध्ये धवन पहिल्या पत्नीपासून विभक्त झाला होता. या व्हिडिओत शिखर एका मुलीबद्दल बोलत आहे. हा व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने बनवला आहे. यात तो शिखरला प्रश्न विचारतोय, जिच्याबद्दल विचारत होतास, तिचं काय झालं. यावर शिखर धवनने उत्तर दिलं आहे. यात शिखरने म्हटलंय, त्यावेळी माझा वाईट काळ सुरु होता. मी अरोडाजींच्या फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेलो होतो, त्यावेळी तिला पहिल्यांदा भेटलो. तो माझ्यासाठी लव्ह अॅट फर्स्ट साईटचा क्षण होता. मी पाहिला आणि पाहातच राहिलो'

यात पुढे धवन धक्कादायक वक्तव्य करताना दिसत आहे. 'तु आपल्या भावाला ओळखतोसच, दोन दिवसात ती माझ्या रुममध्ये...' इतकं बोलून शिखर धवन व्हिडिओ थांबताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना वेग आल आहे. दरम्यान, हा व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन आहे की कोणत्या जाहीरातीचा भाग आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

आयशा मुखर्जीबरोबर पहिलं लग्न
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनचं 2012 मध्ये आयशा मुखर्जीबरोबर लग्न झालं. नुकतीच ते दोघं विभक्त झाले असून आयशा सध्या ऑस्ट्रेलियात झाली. आयशाचं हे दुसरं लग्न होतं, पहिल्या पतीपासून तिला दोन मुली आहेत. आयशा आणि शिखरला 2014 मध्ये मुलगा झाला, त्याचं नाव जोरावर असं ठेवण्यात आलं. 2020 मध्ये आयशा आणि शिखरमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

आयपीएलमध्ये शिखरची कामगिरी
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा शिखर धवनच्या नावावर असून त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. तीन सामन्यात त्याने 225 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.