IPL 2023: धोनीने निवडला रांगडा गडी, सिसांडा मगाला CSK च्या ताफ्यात!

Sisanda Magala Joins CSK: चेन्नई सुपर किंग्जने (CSK) दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाला 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आगामी इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी (IPL 2023) न्यूझीलंडचा गोलंदाज काईली जेमिसनच्या (Kyle Jamieson) जागी संघात घेतल्याची घोषणा केली आहे.

Updated: Mar 21, 2023, 07:17 PM IST
IPL 2023: धोनीने निवडला रांगडा गडी, सिसांडा मगाला CSK च्या ताफ्यात!
IPL 2023,Sisanda Magala,MS Dhoni

IPL 2023 CSK: आयपीएलच्या यंदाच्या हंगामास 31 मार्चपासून सुरूवात होत आहे. IPL 2023 चा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK VS GT) यांच्यात खेळवला जाईल. या हंगाम धोनीसाठी (MS Dhoni) अखेरचा असण्यासाठी शक्यता आहे. अशातच अखेरच्या हंगामात धोनीने एक मोठा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक असताना सीएसकेने (CSK) मोठा निर्णय घेतलाय.

MS Dhoni चा मोठा निर्णय

आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) हंगामासाठी न्यूझीलंडचा गोलंदाज काईली जेमिसनच्या जागी करारबद्ध करण्याची घोषणा केली. जेमिसन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. चेन्नईने 1 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याच्याजागी दक्षिण आफ्रिकेचा (SA) वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाला संघात स्थान देण्यात आलंय. 

आणखी वाचा - IPL 2023 Photos : लाजवाब, बेमिसाल!  7 Over, 7 Maiden, 7 Wickets ; IPL आधीच 'मिस्ट्री बॉलर'चा धमाका

गेल्या काही वर्षांमध्ये देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्ये नियमित विकेट घेणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो त्याच्या 50 लाख रुपयांच्या मूळ किमतीवर CSK मध्ये सामील होईल, असं आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कोण आहे Sisanda Magala?

साऊथ अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू अष्टपैलू सिसांडा (Sisanda Magala) हा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट (Death Over Specialist) आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) देखील सिसांडाच्या गोलंदाजीचा फॅन आहे. सिसांडाने आतापर्यंत 5 एकदिवसीय आणि 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 6 आणि 3 विकेट घेतल्या आहेत. तर आत्तापर्यंत सिसांडाने 136 विकेट नावावर केल्या आहेत.

Kyle Jamieson ची आयपीएल कारकीर्द 

जेमिसन (Kyle Jamieson) यापूर्वी केवळ एकाच IPL हंगामात दिसला होता, जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला 2021 मध्ये 15 कोटींमध्ये खरेदी केलं होतं, ज्यामुळे त्याने 9 सामन्यात 9.60 च्या इकॉनॉमी रेटनं फक्त 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याच्यावर टीका देखील झाली होती.

ट्रेंडिंग न्यूज़

इन्स्टाग्रामवरील मैत्री जीवावर बेतली; गप्पा मारता मारता तरुणाने मुलीला थेट पाचव्या मजल्यावरुन खाली ढकललं

इन्स्टाग्रामवरील मैत्री जीवावर बेतली; गप्पा मारता मारता तरुणाने मुलीला थेट पाचव्या मजल्यावरुन खाली ढकललं

शेतात काम करत असतानाच मृत्यूने गाठले; पाऊस सुरु होण्याआधीच मृत्यूचे थैमान

शेतात काम करत असतानाच मृत्यूने गाठले; पाऊस सुरु होण्याआधीच मृत्यूचे थैमान

धक्कादायक! 1750 कोटी पाण्यात घालणाऱ्या कंपनीच्या हातात हजारो कोटींचे प्रकल्प

धक्कादायक! 1750 कोटी पाण्यात घालणाऱ्या कंपनीच्या हातात हजारो कोटींचे प्रकल्प

"त्यांच्या पक्षात सकाळच्या 'त्या' विधीसाठीही परवानगी घ्यावी लागते"; देवेंद्र फडणवीसांची नाना पटोलेंवर जहरी टीका

"त्यांच्या पक्षात सकाळच्या 'त्या' विधीसाठीही परवानगी घ्यावी लागते"; देवेंद्र फडणवीसांची नाना पटोलेंवर जहरी टीका

'महाभारत' मधील शकुनीमामा उर्फ गुफी पेंटल यांचे निधन

'महाभारत' मधील शकुनीमामा उर्फ गुफी पेंटल यांचे निधन

धावत्या कारमध्ये लोखंडी सळई आरपार घुसली; ठाण्यातील अंगावर काटा आणणारा अपघात

धावत्या कारमध्ये लोखंडी सळई आरपार घुसली; ठाण्यातील अंगावर काटा आणणारा अपघात

Viral Video : 1750 कोटी पाण्यात वाहून गेले; निर्माणाधीन पूल दोन तुकड्यात कोसळला

Viral Video : 1750 कोटी पाण्यात वाहून गेले; निर्माणाधीन पूल दोन तुकड्यात कोसळला

Hairfall Problem: थंड पाण्याने केस धुताय, थांबा! होऊ शकतं नुकसान, कसं ते पाहा

Hairfall Problem: थंड पाण्याने केस धुताय, थांबा! होऊ शकतं नुकसान, कसं ते पाहा

 Wrestlers Protest: साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया नोकरीवर परतले, पण...

Wrestlers Protest: साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया नोकरीवर परतले, पण...

Horoscope 5 June 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी!

Horoscope 5 June 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी!

इतर बातम्या

Rinku Singh: फ्लाइटमध्ये रिंकू सिंगची झाली वाईट अवस्था; व्ह...

स्पोर्ट्स