Hardik Pandya in Mumbai Indians: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपलीय आणि क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या आयपीएलच्या नव्या हंगामाकडे. आयपीएल 2024 पूर्वी गेल्या दोन दिवसात अनेक घडामोडी पाहिल्या मिळाल्यात. भारताचा टी20 आणि आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) घरवापसी झाली आहे. स्वत: हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे हार्दिक पांड्याबाबतच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. हार्दिकने जी पोस्ट शेअर केली आहे त्यात तो मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) जर्सीत दिसतोय. या फोटोला त्याने एक कॅप्शनही दिलाय, त्यात त्याने म्हटंलय 'Home MI Home' यातल्या MI चा अर्थ मुंबई इंडियन्स असा होतो.
गुजरातमधून मुंबईत
हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला रामराम केला आहे. आयपीएलच्या नव्या हंगामात हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. पण मुंबई इंडियन्समध्ये हार्दिकला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणार की तो रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणार याबाबत मात्र सप्सेंस आहे.
कोण होणार कर्णधार
हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्समधल्या समावेशामुळे मुंबईचा कर्णधारपद कोण सांभाळणार याबात क्रिकेट चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. रोहित शर्मा गेले अनेक हंगाम मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतो. आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्स तब्बल पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. पण प्रश्न असा आहे की हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समध्ये कर्णधारपद सांभाळत होता, मग तो मुंबईत फक्त खेळाडू म्हणून कसा खेळेल?
— hardik pandya (@hardikpandya7) November 27, 2023
गुजरातला बनवलं चॅम्पियन
गुजरात टायटन्स संघाने आयपीएल 2022 मध्ये पदार्पण केलं आणि कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. पदार्पणातच हार्दिक पांड्याने गुजरातला आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर आयपीएल 2023मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. गुजरात टायटन्सने पहिल्या हंगामात तब्बल 15 कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतलं. पण आता मुंबई इंडियन्स ऑलराऊंडर कॅमेरुन ग्रीनला ट्रेड करत हार्दिक पांड्याला पुन्हा आपल्या संघात घेतलंय. 2025 मध्ये आयपीएलसाठी पुन्हा मेगा ऑक्शन होणार आहे. त्यापूर्वी मुंबई इंडियन्सने ही मोठी खेळी केली आहे.
गुजरात टायटन्सने केलं ट्विट
सोमवारी गुजरात टायटन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हार्दिक पांड्याला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देणारी पोस्ट केली आहे. त्यानंतर लगेचच मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याचा फोटो ट्विट करत हार्दिक पांड्या मुंबई संघातून खेळणार असल्याचं घोषित केलं. गुजरत टायटन्सने हार्दिक नंतर युव फलंदाज शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवत असल्याची घोषणाही केलीय.