IPL 2024 DC : चार पराभवानंतर दिल्लीचा मोठा निर्णय, हॅरी ब्रुकच्या जागी 'या' खेळाडूची होणार एन्ट्री

IPL 2024 Delhi Capitals : आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. पाच सामन्यातील चौथ्या पराभवासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानावर घसरला. या चार पराभवानंतर दिल्लीच्या संघाने मोठा निर्णय घेतला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 8, 2024, 02:53 PM IST
IPL 2024 DC : चार पराभवानंतर दिल्लीचा मोठा निर्णय, हॅरी ब्रुकच्या जागी 'या' खेळाडूची होणार एन्ट्री  title=

Lizaad Williams joins Delhi Capitals : आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला.  नाणेफेक गमावल्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकार आणि 5 विकेट्ससह 234 धावा केल्या. ऋषभ पंत नेतृत्वाखाली आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पाच सामन्यांतील चौथ्या पराभवासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10व्या स्थानावर घसरला आहे. या चार पराभवानंतर दिल्लीच्या संघाने मोठा निर्णय घेतला आहे. 

दिल्लीला वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून 29 धावांनी पराभव झाला. दिल्लीचा यंदाच्या हांगातील चौथा पराभव होता. दिल्लीची फलंदाजी आणि गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. यानिमित्ताने दिल्लीने नवी चाल खेळली असून त्याच्या हॅरी ब्रूक्रच्या जागी दुसरी रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. हॅरी ब्रूकने काही खास कारणास्तव आयपीएल 2024 मधून बाहेर पडले. त्याच्या अनुषंगाने दक्षिण आफ्रिकेच्या अष्टकोनी खेळाडूच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. त्यामुळे लवकरच ते दिल्लीच्या संघात सहभागी होणार आहे. 

चार पराभवानंतर दिल्लीने आपल्या संघात दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूता समावेश केला आहे. आयपीएल 2024 सुरु होण्यापूर्वी हॅरी ब्रूकने आपले नाव मागे घेतल आहे. मात्र या खेळाडूच्या जागी बदलची घोषणा केली नव्हती. पण आता हॅरी ब्रूकच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिझार्ड विल्यम्स दिल्ली संघात सहभागी होणार आहे. लिझाद विल्यम्स दिल्ली कॅपिटल्समध्ये 50 लाखांमध्ये सहभागी करुन घेतले आहे. 

लिझाद विल्यम्सने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुरुवात केली होती. आतापर्यंत त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 2 कसोटी, 4 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत लिझाद विल्यम्सने कसोटी क्रिकेटमध्ये 3 विकेट्स, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 विकेट आणि टी-20 क्रिकेटमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. लिझाद विल्यम्सने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

दिल्ली कॅपिटल्स संघ : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, स्वस्तिक चिकारा, यश धुल, समृद्ध नोरखिया, इशांत शर्मा, झ्ये रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दार, ललित यादव, मिचेल यादव मार्श, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, रिकी भुई, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, झॅक फ्रेझर गुर्क आणि लिझाद विल्यम्स.