IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये पांड्याचं हार्दिक स्वागत (Hardik Pandya) करण्यात आलंय. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ट्रेडिंग विन्डो नियमानुसार हार्दिक पांड्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं आहे. 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याल रिलीज केलं होतं. त्यानंतर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) हार्दिकवर करोडोची बोली लावत आपल्या संघात घेतलं आणि थेट कर्णधारपदाची जबाबदारी दिली. हार्दिकने आपल्या नेतृत्वात आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवलं. त्यानंतर 2023 च्या आयपीएलमध्ये हार्दिकने गुजरातला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं.
या कामगिरीनंतर हार्दिक पांड्याचा भाव वाढला. याच कारणाने हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने मोठी रक्कम मोजली. पण हार्दिकला संघात घेणं मुंबई इंडियन्सला कदाचित महागात पडू शकतं. हार्दिक पांड्या ऑलराऊंडर खेळाडू आहे. ऐनवेळी मॅच फिरवण्याची क्षमता त्याच्यात आहे. गोलंदाजी, फलंदाजीत तो कमाल आहे. पण या खेळाडूमध्ये काही उणीवा पण आहेत. ज्याचा मुंबई इंडियन्सला धक्का बसू शकतो.
हार्दिकला दुखापतीचं ग्रहण
हार्दिक पांड्याच्या समावेशचा सर्वात पहिला धक्का म्हणजे तो पूर्णपणे फिट नाहीए. गेल्या काही काळात तो सतत दुखापतीमुळे त्रस्त आहे. विश्वचषकाच्या तिसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली आणि संपूर्ण स्पर्धेतूनच त्याला बाहेर व्हावं लागलं. हार्दिकच्या जाण्याने टीम इंडियावर चांगलाच परिणाम जाणवला. टीम इंडिया फायनलमध्यो पोहचली. पण हार्दिकची कमी जाणवली. आयपीएलमध्ये पुन्हा त्याच्या दुखापतीने उचल खाल्ली तर मुंबई इंडियन्सला ते परवडण्यासारखं नसेल.
गोलंदाजीत बसू शकतो धक्का
मुंबई इंडियन्सने 2022 मध्ये यासाठी रिटेन केलं नव्हतं कारण हार्दिक पांड्या गोलंदाजी करु शकत नव्हता. गोलंदाजी करण्यास तो पूर्णपण फिट नव्हता. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर मुंबईला ते चांगलंच महागात पडू शकतं. गोलंदाजी हार्दिक पांड्यााचा प्लस पॉईंट आहे. पण आयपीएलमध्ये तो गोलंदाजीच करु शकला नाही तर केवळ फलंदाजीला महत्वा उरणार नाही. कारण तो तळाच्या क्रमवारीत फलंदाजीला येतो.
हार्दिकमुळे संघात नाराजीनाट्य
हार्दिकच्या समावेशााचा सर्वात मोठा धक्का म्हणजे मुंबई इंडियन्समध्ये रंगलेलं नाराजीनाट्य. हार्दिकच्या समावेशामुळे काही खेळाडू नाराज असल्याचं बोललं जातंय. याचं पहिलं उदाहरण म्हणजे हार्दिकच्या समावेशनंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची इन्स्टाग्राम पोस्ट. आपल्या पोस्टमध्ये जसप्रीत बुमराहने 'कधी-कधी गप्प राहणाचं उत्तर असतं' असं म्हटलं आहे. बुमराहची पोस्ट हार्दिक पांड्याच्या प्रवेशाशी जोडली जात आहे. शिवाय जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सला इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अनफॉलो केल्याचीही चर्चा आहे. हार्दिक पांड्याच्या समावेशामुळे बुमराहा सर्वात मोठा धोका संभवोत. कारण रोहित शर्मानंतर मुंबईचा पुढचा कर्णधार म्हणून बुमराहकडे पाहिलं जात होतं.