सेम टू सेम! आयपीएल फायनलमध्ये WPLची पुनरावृत्ती.... 5 आश्चर्यकारक योगायोग

IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्ऱॉफीवर नाव कोरलं. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायर्स हैदराबादच्या अंतिम सामन्यात पाच आश्चर्यकारक योगायोग पाहायला मिळाले. दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या डब्ल्यूपीएलमध्येही अशाच गोष्टी घडलेल्या.

राजीव कासले | Updated: May 27, 2024, 03:52 PM IST
सेम टू सेम! आयपीएल फायनलमध्ये WPLची पुनरावृत्ती.... 5 आश्चर्यकारक योगायोग  title=

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगचा सतरावा हंगाम अखेर संपला आहे. 26 मे रोजी म्हणजे रविवारी खेळवल्या गेलेल्या आयपीएल 2024 अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR)  सनरायजर्स हैदराबादचा (SRH) 8 विकेटने पराभव कर आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. आयपीएल ट्ऱॉफी जिंकण्याची कोलकाताची ही तिसरी वेळ ठरली आहे. याआधी 2012 आणि 2014 मध्ये कोलकाता आयपीएल चॅम्पिटन ठरली होती तर सनरायजर्स हैदाराबादचं दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळालं.

विशेष म्हणजे आयपीएल 2024 चा अंतिम सामना पाहून क्रिकेट चाहत्यांना महिला प्रीमिअर लीगच्या (WPL) अंतिम सामन्याची आठवण झाली. आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमध्ये पाच आश्चर्यकारक योगायोग जुळून आलेत.

1. आयपीएल 2024 अंतिम सामन्यात एका संघाचा भारतीय कर्णधार  (श्रेयस अय्यर) होता. तर दुसऱ्या संघाचा कर्णधार ऑस्ट्रेलियाचा  (पॅट कमिंस) होता.  WPL 2024 च्या अंतिम सामन्यातही एका संघाची कर्णधार भारतीय होती तर दुसऱ्या संघाची कर्णधार ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग होती. लॅनिंग दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार होती. तर भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृति मंधाना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कर्णधार होती.

2..WPL 2024 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगने टॉस जिंकून फलंदाजी घेतली होती. तर IPL 2024 अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 

3. WPL 2024 अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ 18.3 षटकात 113 धावांवर ऑलआऊट झाला होता. तर IPL 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा संघही 18.3 षटकात 113 धांवर ऑलआऊट झाली. म्हणजे पहिली फलंदाजी करणाऱ्या दोन्ही संघांनी सारख्याच षटकात एकसारख्याच धावा केल्या होत्या.

4. WPL 2024 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आठ विकेट राखून विजय मिळवला होता. आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यातही कोलकाता नाईट रायडर्सने आठ विकेट राखून विजय मिळवला.

5. WPL 2024 भारतीय कर्णधार स्मृती मंधानाने ट्रॉफी उचलली. तर आयपीएल 2024 मध्ये भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने ट्रॉफी उंचावली.

आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक विकेट
• हर्षल पटेल (पंजाब किंग्स)- 24 विकेट
• वरुण चक्रवर्ती (कोलकाता नाइट राइडर्स)-  21 विकेट
• जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)- 20 विकेट
• आंद्रे रसेल (कोलकाता नाइट राइडर्स)- 19 विकेट
• हर्षित राणा (कोलकाता नाइट राइडर्स)- 19 विकेट

आयपीएल 2024 में सर्वाधिक धावा
• विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)- 741 धावा
• ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स)- 583 धावा
• रियान पराग (राजस्थान रॉयल्स)- 573 धावा
• ट्रेविस हेड (सनराइ़जर्स हैदराबाद)- 567 धावा
• संजू सैमसन (राजस्थान रॉयल्स)- 531 धावा