RCB आणि CSK च्या चाहत्यांमध्ये 'दे दणादण', स्टेडिअममधल्या तुफान हाणामारीचा Video व्हायरल

IPL 2024 RCB vs CSK : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान सामना नेहमीच चुरशीचा रंगतो. मैदानावर हे दोन्ही संघ आमने सामने आल्यावर एक वेगळीच टशन पाहायाला मिळते. पण ही टशन हाणामारीपर्यंत पोहोचली आहे.

राजीव कासले | Updated: May 24, 2024, 08:11 PM IST
RCB आणि CSK च्या चाहत्यांमध्ये 'दे दणादण', स्टेडिअममधल्या तुफान हाणामारीचा Video व्हायरल title=

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये शेवटच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) चुरशीचा सामना रंगला. बंगळुरु आणि चेन्नई आयपीएलमध्ये जितके एकमेकांचे  कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, तितकीच या दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्येही टशन पाहायला मिळते. सोशल मीडियावर या दोन्ही संघांचे चाहते एकमेकांना जबरदस्त ट्रोल करत असतात. पण 18 मेच्या लढतीचा निकाल थेट हाणामारीपर्यंत आला. दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये स्टेडिअममध्येच फ्री स्टाईल रंगली (RCB vs CSK Fans Fight). याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

एलिमिनेटर सामन्यावेळची घटना
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 22 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान एलिमिनेटरचा सामना रंगला. राजस्थानने बंगळुरुचा पराभव करत स्पर्धेतून बाहेर केलं. यानंतर बंगळुरुला सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल करण्यात आलं. या सामन्यानंतर स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या चेन्नईच्या चाहत्यांनी आरसीबीच्या चाहत्यांना चिडवायला सुरुवात केली. पण हे चिडवणं सहन न झाल्याने आरसीबीचा चाहता चेन्नईच्या चाहत्यावर धावून गेला. विराट कोहलीची जर्सी नंबर असलेल्या चाहत्यांनी चेन्नईच्या चाहत्याला अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. 

18 मेला वादाची सुरुवात
वास्तविक या वादाची सुरुवात 18 मे रोजी झालेल्या सीएसके आणि आरसीबीदरम्यानच्या सामन्यापासून झाली. आयपीएलच्या शेवटच्या लीग सामन्यात बंगळुरुने चुरशीच्या लढतीत चेन्नईचा पराभव करत प्लेऑफमध्ये जागा एन्ट्री केली. या विजयानंतर बंगलुरुच्या समर्थकांनी संपूर्ण शहरात फटाके फोडत जल्लोष साजरा केला. बंगळुरुच्या चाहत्यांकडून चेन्नईच्या चाहत्यांना वाईट वागणूक दिली गेल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे एलिमिनेटरच्या सामन्यात चेन्नईचे सपोर्टस मोठ्या संख्येने अहमदाबादला पोहोचले. राजस्थानने बंगळुरुला हरवताच चेन्नईच्या चाहत्यांना ट्रोलिंग सुरु केलं. त्यामुळे चिडलेल्या बंगळुरुच्या चाहत्यांनी मारहाण सुरु केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sk Surela (@peace_dude___9)

बंगळुरुचा आयपीएलमधला प्रवास
गेल्या 17 वर्षात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएलचं एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही. आयपीएलच्या पहिल्या म्हणजे 2008 च्या हंगामापासून बंगळुरुचा संघ आयपीएल खेळतोय. 2016 मध्ये बंगळुरुने आयपीएलची अंतिम फेरी गाठली. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. या हंगामातही खराब सुरुवातीनंतर बंगलुरुने जोरदार कमबॅक करत सलग सहा सामने जिंकले. लीगच्या शेवटच्या सामन्यात विजयाबरोबरच चांगल्या रनरेटची गरज असताना बंगळुरुने ते साध्य करुन दाखवलं. पण प्ले ऑफमध्ये त्यांच्या जेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या.