Virat Kohli Retirement : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या 35 वर्षांचा आहे, तरी देखील विराटची फिटनेस एखाद्या तरुणाला देखील लाजवेल. विराटला अजूनही युवा खेळाडू कोणत्याही खेळात हरवू शकत नाहीत. आता विराटचं वय वाढत असल्याने त्याच्या निवृत्तीवर अनेक चर्चा होताना दिसत आहेत. मात्र, विराट आणखी 5 वर्ष आरामात क्रिकेट खेळेल, असं अनेकांचं म्हणणं आहे. अशातच आता विराट कोहलीच्या निवृत्तीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्न (Michael Vaughan) याने मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाला मायकल वॉर्न?
विराट कोहलीसाठी हा मोसम खूप चांगला होता. तुम्ही विराट कोहली आणि निवृत्तीबद्दल बोलताय पण, त्याच्याकडे पाहून मला वाटतं की तो बराच काळ खेळू शकतो. तो तसा फिट आहे. जोपर्यंत त्याचे मन बदलत नाही तोपर्यंत तो फिटनेसमुळे निवृत्त होणार नाही, असं वक्तव्य मायकल वॉर्नने केलंय. तसेच जर त्याने त्याच्या कुटुंबाचा विचार केला, तर कदाचित तो लवकर निवृत्त होण्याची शक्यता आहे, असंही मायकल वॉर्नने म्हटलं आहे. दोन-तीन वर्षांत सर्वकाही बदलतं, कदाचित त्याला फक्त शांत वेळ घालवायचा आहे, असंही मायकल वॉर्नने म्हटलं आहे.
जेव्हा भारतात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होती, तेव्हा तो कुटूंबासाठी लंडनला गेला अन् वेळ घालवला. मला वाटतं त्याला सामान्य माणसाप्रमाणे रहायला आवडतं. मला वाटतं की क्रिकेटपासून त्याला जसं दूर जाता येईल, तसं त्याने जावं आणि थोडा शांत वेळ घालवावा, असंही मायकल वॉर्नने म्हटलं आहे.
दरम्यान, आपल्या क्रिकेटची शैली पुर्णपणे जपत विराटने बदलत्या टी-ट्वेंटी क्रिकेटवर देखील प्रभुत्व गाजवलंय. उगाच अंदाधुंद फटकेबाजी न करता विराटने नव्या फॉरमॅटमध्ये देखील अफलातून कामगिरी करतोय. तिन्ही फॉरमॅट खेळणारा विराट आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करतोय? यावर सर्वाचं लक्ष लागलंय.
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.