हैदराबादच्या विजयाने IPL पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, पाहा कितव्या क्रमांकावर तुमची फेव्हरेट टीम

IPL 2024 Points Table Updates : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आठवा सामना रेकॉर्डब्रेक झाला. मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात आयपीएल इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. हैदराबादच्या विजयाने पॉईंटटेबलमध्येही उलटफेर झालेत. 

राजीव कासले | Updated: Mar 28, 2024, 04:19 PM IST
हैदराबादच्या विजयाने IPL पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, पाहा कितव्या क्रमांकावर तुमची फेव्हरेट टीम title=

IPL 2024 : आयपीएल 2024 मधील आठवा सामना रेकॉर्डब्रेक झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबाददरम्यान (MI vs SRH) रंगलेल्या या सामन्यात आयपीएल इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले, तर नवे विक्रम रचले गेले. आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावांचा विक्रम, वेगवान अर्धशतकाचा विक्रम, एका सामन्यात सर्वाधिक षटकारांचा विक्रम, एका सामन्यात चौकारांचा विक्रम, 7 व्या षटकात शंभर धावा असे एक ना अनेक विक्रम या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना पाहायाल मिळाले. सनराजयर्स हैदराबादने तब्बल 277 धावा केल्या. तर मुंबई इंडियन्सने 246 धावा केल्या.

पॉईंटटेबलमध्ये उलटफेर
सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) विजयाने पॉईंट टेबलमध्ये (IPL PointTable) मोठा उलटफेर झालाय. मुंबईवरच्या विजयाने हैदराबादचा संघ पॉईंटटेबलमध्ये थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. हैदराबादच्या खात्यात दोन सामन्यात दोन पॉईंट जमा झाले आहेत. तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स पॉईंट टेबलमध्ये टॉपवर आहे. चेन्नईने सलग दोन विजय मिळवले असून त्यांच्या खात्यात 4 पॉईंट जमा झाले आहेत.

संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स दुसऱ्या पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्र बंगळ आणि गुजरात टायटन्स चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहे. या सर्व संघांच्या खात्यात दोन पॉईंट आहेत. प्रत्येक संघाने एक विजय मिळवलाय. तर एकट्या चेन्नईच्या खात्यात दोन विजयांची नोंद आहे. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स अद्याप आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. केएल राहुलचा लखनऊ सुपर जायंट्चा संघ सर्वात तळाला म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. तर हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर आहे. 

ऑरेंज कॅपचा मानकरी
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सनरायर्स हैदराबादच्या हेन्रिक क्लासेनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. हेन्रिक क्लासेनने दोन सामन्यात 143 धावा केल्यात. नाबाद 80 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने 2 सामन्यात 98 धावा केल्यात. हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा 95 धावांसह तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्सचा तिलक वर्मा 89 धावांस चौथ्या क्रमांकार आहे.

पर्पल कॅपचा मानकरी
पर्पल कॅपच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग्सचा मुस्तफिजुर रेहमान अव्वल स्थानावर आहे. त्याने दोन सामन्यात सहा विकेट घेतल्यात. तर तीन विकेटस्ह दुसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्सचा हरप्रीत ब्रार आणि तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आहे. पंजाबचा कागिसो रबाडाच्या खात्यातही तीन विकेट आहेत. तो चौथ्या क्रमांकावर आहे.