कोलकाता : आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला. या लिलावात मुंबईच्या टीमनी ६ खेळाडूंना विकत घेतलं. मुंबईने नॅथन कुल्टर नाईलसाठी ८ कोटी रुपये, क्रिस लीनसाठी २ कोटी रुपये, सौरभ तिवारीसाठी ५० लाख, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख आणि प्रिन्स बलवंत राय यांच्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये मोजले. यातल्या दिग्विजय देशमुख या महाराष्ट्राच्या खेळाडूची कहाणी रोचक आहे.
२१ वर्षांच्या दिग्विजय देशमुख याने महाराष्ट्रासाठी १ प्रथम श्रेणी मॅच आणि ७ टी-२० मॅच खेळल्या आहेत. दिग्विजय हा फास्ट बॉलिंग आणि बॅटिंगही करतो. दिग्विजय देशमुखने १०४ रन केल्या असून १५ विकेटही घेतल्या आहेत.
दिग्विजय देशमुख याने अली हाशमीच्या काय पो छे या चित्रपटातही काम केलं आहे. २०१३ साली आलेल्या या चित्रपटात दिग्विजय देशमुख सुशांतसिंग राजपूत, अमित साध, राजकुमार राव, मानव कौल यांच्यासोबत दिसला. सुशांत, अमित आणि राजकुमार हे एका लहान मुलाला मोठा क्रिकेटपटू बनवण्यासाठी झटत असतात. या मुलाचं काम दिग्विजय देशमुखने केलं आहे. १४ वर्षांचा असताना दिग्विजय या चित्रपटात दिसला, आता ७ वर्षानंतर तो आयपीएलच्या १३व्या मोसमात मुंबईच्या जर्सीमध्ये दिसेल.
Digvijay Deshmukh has acted in a film called " Kai Po Che " when he was 14 year old. 7 years later, @mipaltan has picked him in the IPL auction ahead of the 13th season. #IPL2020 #IPLAuctionhttps://t.co/OqttobtBjw
— Johns (@CricCrazyJohns) December 20, 2019
दिग्विजय देशमुखने २०१९-२० साली रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं आहे. तर १२ नोव्हेंबर २०१९ ला दिग्विजय सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत महाराष्ट्राकडून पहिल्यांदाच खेळला.