मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या मेगा ऑक्शनचा (IPL Mega Auction 2022) आजचा (13 फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. दिल्ली कॅपिट्लसने (Delhi Capitals) आपल्या ताफ्यात घातक गोलंदाजाला घेतलं आहे. या गोलंदाजावर गेल्या वर्षी दुखाचा डोंगर कोसळला होता. या क्रिकेटपटूच्या वडिलांचं आधी कोरोनामुळे निधन झालं होतं. तर त्यानंतर भावाने आत्महत्या केली होती. मात्र या लिलावात या खेळाडूचं नशीब फळफलंल आहे. चेतन साकरियाला (Chetan Sakariya) दिल्लीने 4 कोटी 20 लाख रुपये मोजून आपल्याकडे घेतलं आहे. (ipl mega auction 2022 day 2 delhi capitals buy chetan sakariya in 4 crore 20 lakh)
भावाची आत्महत्या आणि वडिलांचा मृत्यू
आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या लिलावाआधी चेतनच्या भावाने आत्महत्या केली होती. तर यानंतर 14 व्या मोसमादरम्यान मे महिन्यात चेतनच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. चेतन 14 व्या मोसमात राजस्थानकडून खेळत होता.
चेतनच्या वडिलांवर उपचार करण्यासाठी राजस्थानने आर्थिक मदत केली होती. मात्र दुर्देवाने चेतनच्या वडिल वाचू शकले नाहीत.
हलाखीची परिस्थिती
चेतनच्या घरची परिस्थिती फार बेताची होती. सुरुवातीच्या दिवसात घराची सर्व जबाबदारी हे चेतनवर होती. मात्र त्यानंतरही त्याने क्रिकेट सुरुच ठेवलं. चेतनकडे क्रिकेटसाठी बूटही नव्हते. घरखर्चासाठी चेतनला लहान मोठी कामं करावी लागली होती.
धोनीचा अविस्मरणीय विकेट
चेतनने आयपीएलच्या 14 व्या मोसमात 14 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये त्याने दिग्गज खेळाडूंना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. यामध्ये सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, केएल राहुल, नितीश राणा यासारख्या फलंदाजांचा समावेश होता. चेतनसाठी आजही धोनीची विकेट घेणं ही अविस्मरणीय घटना राहिली आहे.
दरम्यान गेल्या मोसमात 14 विकेट्स घेणारा चेतन या हंगमात किती विकेट घेणार, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.