IPL2021: इंग्लंड सीरिजदरम्यान विराट कोहलीकडून मेसेज, एबी डिविलियर्सचा खुलासा, व्हिडीओ

इंग्लंड सीरिजदरम्यान विराट कोहली आणि डिविलियर्स यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? 

Updated: Apr 16, 2021, 04:47 PM IST
IPL2021: इंग्लंड सीरिजदरम्यान विराट कोहलीकडून मेसेज, एबी डिविलियर्सचा खुलासा, व्हिडीओ

मुंबई: रॉयल चॅलेंजर संघातील तुफान फलंदाज एबी डिविलियर्सची कामगिरी गेल्या दोन सामन्यातील उत्तम राहिली आहे. पॉइंट टेबलमध्ये बंगळुरू संघाला पहिल्या स्थानावर नेण्यात आणि पहिला सामना जिंकवून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. एका मुलाखतीदरम्यान डेविलियर्सने विराट कोहलीबाबत एक खुलासा केला आहे. 

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज दरम्यान विराट कोहलीनं त्याला केलेल्या मेसजबाबत खुलासा गेला आहे. एबी डिविलियर्सनं सांगितलं की, 'मला तो मेसेज करेल हे अपेक्षितच होतं. त्यामुळे त्याचा मेसेज आल्यानंतर मला आश्चर्य वाटलं नाही. त्याला माझ्यासोबत बोलायचं होतं. '

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघाने डिविलियर्सचा व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. एका मुलाखती दरम्यान डिविलियर्स म्हणाला की, आमच्यात काय चर्चा झाली ती मी पूर्णत: सांगू शकत नाही पण आम्ही चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

या महत्त्वाच्या मुद्द्यापैकी काही मुद्दे खेळाशी निगडीत होते. तर काही मुद्दे खेळाव्यतिरिक्त देखील होते. RCB संघ, मैदानात तो स्वत: खूप तणावात असतो त्याबद्दलही चर्चा केल्याचं डेविलियरनं सांगितलं आहे. याशिवाय खेळातील काही तांत्रिक मुद्द्यांवरही चर्चा केल्याचं स्पष्टीकरण डिविलियर्सने दिलं आहे.

 

9 एप्रिल रोजी झालेल्या बंगळुरू संघाच्या पहिल्या सामन्यात डिविलियर्सचं अर्धशतक हुकलं तरी 27 चेंडूमध्ये त्याने 48 धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात एक रन काढून तंबुत परला होता.