युएई : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारत आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) या दोन्ही संघात 28 ऑगस्टमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्याआधीच वातावरण चांगलंच तापताना दिसत आहे. कारण दोन्ही संघाचे खेळाडू भिडताना दिसत आहे. त्यामुळे या सामन्याआधीच वातावरण तापलं आहे. नेमकं भारत-पाकिस्तानमध्ये वातावरण तापायला झालंय काय ते जाणून घेऊयात.
भारत आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) यांच्यातील सामन्याची उत्सुकता दोन्हीकडच्या चाहत्यांना लागलीय. त्यामुळे कधी एकदा तो दिवस उजाडतोय अशी चाहत्यांना उत्सुकता लागलीय. त्यातच सामन्यापुर्वीच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा अनुभवी बॉलर शाहीन आफ्रिदी (shaheen afridi) आशिया कपमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाला आशिया कपमध्ये मोठा धक्का बसला आहे.
टीम इंडियाला डिवचलं
शाहीन आफ्रिदी (shaheen afridi) पाकिस्तान संघातून बाहेर झाल्यानंतर माजी क्रिकेटपटू वकार युनूसने ट्विट करून टीम इंडियाला डिवचलं होतं. शाहीन आफ्रिदी (shaheen afridi) बाहेर झाल्याने टीम इंडियासाठी दिलासादायक गोष्ट असल्याचे त्याने म्हटले होते. त्यामुळे टीम इंडियाला जर पाकिस्तानने डिवचलं तर भारताचे माजी खेळाडू शांत राहणार आहेत का? त्यांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली.
भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने (irfan pathan) त्याला चोख प्रत्युत्तर दिले. इरफान पठाणने रविवारी एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याने लिहिले की, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल आशिया कप खेळत नाहीत ही इतर संघांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इरफानचा (irfan pathan) रोख हा पाकिस्तानकडेच आहे. फक्त त्याने पाकिस्तानचं ठळकपणे नाव मेन्सन केलं नाहीए. दरम्यान इरफानचे हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.
#INDvPAK #AsiaCup https://t.co/VwOfTLKOaJ pic.twitter.com/OUIhi0LOCj
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 21, 2022
टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरनेही याचा आनंद घेतला, त्याने एक मीम ट्विट केला आणि लिहिले की, तुम्ही काहीही बोलू नका, पण मी ऐकले. या दोघांच्या या प्रतिक्रियेमुळे पाकिस्तानी संघ ट्रोल झाला आहे.
दरम्यान ट्विटरवर रंगलेल्या या युद्धाने आशिया कप (Asia Cup 2022) मधील सामन्याआधीच भारत -पाकिस्तान सामन्यासाठी वातावरण निर्मिती झाल्याचे पाहायला मिळाले.