मुंबई : भारतीय गोलंदाज हरभजन सिंग आणि गीता बसेराच्या आयुष्यात लवकरच अजून एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
एका मुलाखतीमध्ये हरभजन सिंगने याबाबतचे संकेत दिले आहे.
उत्तर भारतामध्ये लोहरी या सणाची धूम असते. मात्र क्रिकेटर हरभजन सिंग एकटाच हा सण का साजरा करत आहे ? असा प्रश्न विचारल्यानंतर या गूडन्यूजचा अंदाज लागला आहे.
हरभजन सिंग उत्तर देताना म्हणाला," कदाचित पुढच्यावर्षी हिनायाचा ( हरभजन सिंगची मुलगी) भाऊ किंवा बहिण आल्यानंतर आणखी धूमधडाक्यात साजरी करू. मला लहान मुलं खूप आवडतात, मग ती स्वतःची असो किंवा दुसर्यांची.
हरभजनसिंगने थेट खुलासा केला नसला तरीही त्याबाबतचे काही संकेत दिले आहेत.
हरभजन सिंगची पत्नी गीता बसेरा आणि मुलगी सध्या लंडनमध्ये आहे. विराटच्या रिसेप्शनसाठी हरभजन त्यांना तेथेच ठेऊन भारतामध्ये परतला आहे.
2015 साली हरभजन सिंग आणि गीता बसेराचा विवाह झाला. त्यानंतर वर्षभरातच हिनाया त्यांच्या आयुष्यात आली. गीताने 2016 मध्ये लंडनमध्ये हिनायाला जन्म दिला होता.