Ind VS Eng : ईशानकडून अर्धशतक 'या' व्यक्तीला समर्पित, भावूक होत शेअर केली गोष्ट

धमाकेदार अर्धशतकामागची खरी प्रेरणा कोण? 

Updated: Mar 15, 2021, 09:25 AM IST
Ind VS Eng : ईशानकडून अर्धशतक 'या' व्यक्तीला समर्पित, भावूक होत शेअर केली गोष्ट  title=

मुंबई : इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ईशान किशनने (Ishan Kishan)  भारतीय संघात डेब्यू केला. आपल्या पहिल्याच सामन्यात ईशानने शानदार 56 धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने इंग्लंडला 7 विकेटने हरवून सीरिजमध्ये 1-1 ची बरोबरी केली. ईशानला या उत्तम खेळाकरता 'मॅन ऑफ द मॅच' (Ishan Kishan get emotional afther the blast debut)  देण्यात आला. 

या शानदार खेळानंतर ईशानने सांगितलं की,'या खेळाचं संपूर्ण श्रेय हे माझ्या वरिष्ठ खेळाडूंना जातं. ज्यांनी मैदानावर जाऊन मला माझा खेळ खेळण्याचा सल्ला दिला. पहिल्याच सामन्यात आपण टॉपच्या टीमसोबत खेळणं सोपी गोष्ट नाही.'

पुढे ईशान म्हणाला की,'मुंबई इंडियन्सच्या संघात खेळण्याचा मला खूप फायदा झाला. याच सामन्यातील खेळात मला सातत्य ठेवायचं आहे. मला माहित नाही असा अनुभव मला पुन्हा मिळेल की नाही. पण आता मी खूप आनंदी आहे. मी माझ्या सर्व कोचचे आभार मानतो. ज्यांच्यामुळे मला हे यश मिळालं.' (डेब्यू सामन्यात ईशान किशनचं तुफानी अर्धशतक) 

'आता मला मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आहे. या खेळानंतर माझ्यातील धावांची भूक वाढली असून मला आणखी चांगला सामना खेळायचा आहे.', असं देखील तो म्हणाला. यावेळी ईशानने आपल्या कोचच्या वडिलांचं देखील स्मरण केलं. त्यांच काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे. ईशान त्याचा आताचा खेळ त्यांना समर्पित करत आहे. 

या कारणामुळे ईशानने केलं अर्धशतक 

ईशानने आपल्या संपूर्ण खेळाचं श्रेय कोचच्या वडिलांना समर्पित केलं आहे. ईशान म्हणतो की,'माझ्या कोचने मला सांगितलं होतं की, पहिल्या सामन्यात माझ्या वडिलांसाठी कमीत कमी अर्धशतक तरी नक्की करं. याच कारणामुळे मी माझा संपूर्ण खेळ त्यांना समर्पित केला आहे.'