बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा इशान किशन दुखापतग्रस्त

मुंबई आणि बंगळूरु यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबईचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन दुखापतग्रस्त झाला. 

Updated: Apr 18, 2018, 10:21 AM IST
बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा इशान किशन दुखापतग्रस्त title=

मुंबई  : मुंबई आणि बंगळूरु यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबईचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन दुखापतग्रस्त झाला. जसप्रीत बुमराहच्या डावातील १३व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीने शॉट लगावला. हा शॉट मिड विकेटवर हार्दिक पांड्याने पकडला. जसा पांड्याने हा चेंडू थ्रो केला तेव्हा हा चेंडू इशानच्या तोंडावर लागला.

इशानने त्यावेळी हेल्मेट घातले नव्हते. यामुळे तो चेंडू जोरात येऊन चेहऱ्यावर आदळला. हा फटका इतका मोठा होता की इशान खालीच कोसळला. मैदानावर तात्काळ फिजिओला बोलावण्यात आले. इशान कोसळल्याचे पाहून भितीने मुंबईच्या प्लेयर्सनी इशानकडे धाव घेतली. इशानच्या डाव्या डोळ्याला जखम झाली नव्हती. नशीब चांगले की डोळा वाचला होता.

इशाच्या चेहऱ्यावर सूज आली होती. दरम्यान त्याला खेळ अर्धवट सोडावा लागला. इशानच्या अनुपस्थितीत आदित्य तरेने मुंबईसाठी विकेटकीपिंग केली. या सामन्यात मुंबईने बंगळुरुविरुद्ध ४६ धावांनी विजय मिळवला. मुंबईचा या स्पर्धेतील पहिला विजय आहे. सलग तीन सामन्यांतील पराभवानंतर रोहितसह मुंबईला विजयाचा सूर गवसला. 

बंगळूरुचा कर्णधार विराट कोहली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला. त्याने ६२ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. या खेळीनंतरही त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला.