World Cup 2023 : 'आईने मला सांगितलंय, काहीही झालं तरी...', वर्ल्ड कपपूर्वी Ishan Kishan ला आठवले ते शब्द!

Ishan Kishan Mother : टीम इंडियाचा (Team India) स्टार विकेटकिपर फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) यावर अतिरिक्त प्रेशर असणार आहे. त्याचं कारण नेमकं काय आहे? 

Updated: Oct 6, 2023, 06:02 PM IST
World Cup 2023 : 'आईने मला सांगितलंय, काहीही झालं तरी...', वर्ल्ड कपपूर्वी Ishan Kishan ला आठवले ते शब्द! title=
Ishan Kishan Mother World Cup 2023

Ishan Kishan, World Cup 2023 : टीम इंडियाच्या 'मिशन वर्ल्ड कप'ला आता सुरूवात झाली आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड (NZ vs ENG) यांच्यातील सलामीच्या सामन्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात येत्या 8 तारखेला सामना रंगणार आहे. त्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली असून रोहित अँड कंपनी सध्या मैदानात घाम गाळताना दिसत आहे. यंदाचा वर्ल्ड कप (Cricket World Cup) भारतात असल्याने टीम इंडियावर वर्ल्ड कप जिंकण्याचं प्रेशर असेल. मात्र, टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) यावर अतिरिक्त प्रेशर असणार आहे. त्याचं कारण नेमकं काय आहे? याचा खुलासा खुद्द इशानने केला आहे.

काय म्हणाला Ishan Kishan ?

मी वर्ल्ड कपसाठी तयारी करत होतो, तेव्हा माझ्या आईने मला सांगितलंय, तुला वर्ल्ड कप जिंकवायचा आहे, तोही कोणत्याही किंमतीत... त्यामुळे माझ्यावर आता अतिरिक्त प्रेशर असेल, असं इशान किशन याने म्हटलं आहे. विकेटकिपर फलंदाज म्हणून इशान किशनची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे. आशिया कपमध्ये जेव्हा भारताचे फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजांविरुद्ध लोटांगण घालत होते, तेव्हा इशान किशनने टीम इंडियाची खेळी सांभाळली अन् भारताची लाज राखली होती. 

आणखी वाचा - Tilak Varma : तिलक वर्माच्या टॅटूमध्ये आहे तरी कोण? वाचा सेलिब्रेशनचं खास कारण!

इशानच्या याच उल्लेखनिय कामगिरीमुळे त्याला वर्ल्ड कप संघात स्थान मिळालंय. असातच आता इशानला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याला कारण केएल राहुल... केएल देखील विकेटकिपर फलंदाज असल्याने इशान किशनला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अशातच इशान डावखुरा असल्याने रोहित शर्मा त्याचा विचार करू शकतो. इशान संघात असेल तर संघाबाहेर कोण जाणार? असा सवाल विचारला जातोय. श्रेयस अय्यरला संघाबाहेर ठेवणं, टीम इंडियाला परवडणार आहे का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे. 

पाहा वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.