आय लव्ह यू....; सूर्याच्या पत्नीला 'हे' काय बोलून गेला Ishan Kishan

इंग्लंड दौऱ्यापासून आतापर्यंत दोन वेळा यादवची पत्नी त्याची फलंदाजी पाहण्यासाठी मैदानात आली नाही 

Updated: Aug 4, 2022, 12:12 PM IST
आय लव्ह यू....; सूर्याच्या पत्नीला 'हे' काय बोलून गेला Ishan Kishan title=

त्रिनिदाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सूर्याने 44 चेंडूत 77 रन्स करत भारताला 165 रन्सचं आव्हान दिलं आणि या सात विकेटने विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या खेळीसाठी सूर्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला.

त्याचवेळी, मॅचनंतर ईशानने सूर्यकुमारची एक मुलाखतही घेतली ज्यामध्ये दोघांनी खूप धमाल केली. या मुलाखतीत ईशानने सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या नावावरही प्रश्न केला होता. या मुलाखतीदरम्यान ईशान किशनने सुर्यकुमारच्या पत्नीला, भाभी आय लव्ह यू असं म्हटलंय. दरम्यान मुलाखतीच्या शेवटी, त्याने देविशाला भारतीय सामन्यांदरम्यान तिची उपस्थिती कमी करण्याचं आवाहन देखील केलंय.

इंग्लंड दौऱ्यापासून आतापर्यंत दोन वेळा यादवची पत्नी त्याची फलंदाजी पाहण्यासाठी मैदानात आली नाही आणि या दोन्ही प्रसंगी सूर्यकुमार चांगला खेळतोय. गेल्या महिन्यात ट्रेंटब्रिजमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्यात देविशाचा उपस्थित नव्हती. तेव्हा सुर्याने धमाकेदार शतक झळकावलं. 

यावेळी एक प्रश्न विचारताना ईशान किशन म्हणाला, देविशा भाभी आय लव्ह यू, पण मला सुर्यकुमारला हा प्रश्न विचारायचा आहे.

इशानने या मुलाखतीदरम्यान सूर्यकुमारला याबद्दल विचारलं, ज्यावर भारताचा स्टार फलंदाज म्हणाला, "हे बघ, माणूस खोटं बोलतो तेव्हा तो अडखळतो. मी खोटे बोलत नाही. मी डगआउटमध्ये काय केले ते मी सांगेन. मी म्हणालो, ते काय आहे?, मैदानावर जोडीदार असणं आवश्यक नाही. तो तुमच्यासोबत आहे हे महत्त्वाचे आहे. ती या देशात आहे आणि तिच्या नावाच टॅटूही छातीवर आहे. त्यामुळेच ती माझ्या हृदयाच्या जवळ आहे."