जेम्स अंडरसनवर कारवाई, १५ टक्के मानधन कापणार

इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनवर आयसीसीनं कारवाई केली आहे. 

Updated: Sep 9, 2018, 06:14 PM IST
जेम्स अंडरसनवर कारवाई, १५ टक्के मानधन कापणार title=

लंडन : इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनवर आयसीसीनं कारवाई केली आहे. जेम्स अंडरसनवर दंड म्हणून त्याचं १५ टक्के मानधन कापण्यात येणार आहे. दंडाबरोबरच अंडरसनला एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे. भारतीय इनिंगच्या २९ व्या ओव्हरमध्ये विराट कोहली बॅटिंग करत असताना अंडरसननं एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं. डीआरएस घेतल्यानंतर विराटला नॉट आऊट देण्यात आलं. पण जेम्स अंडरसन यामुळे नाराज झाला आणि त्यानं अंपायर कुमार धर्मसेनाच्या हातातून टोपी खेचून घेतली आणि आक्रमक भाषा वापरली.

अंडरसन खेळाडू आणि खेळाडूंचा सपोर्ट स्टाफशी जोडल्या गेलेल्या आयसीसी आचार संहिता नियम २.१.५ चं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला. आयसीसीचं हे कलम आंतरराष्ट्रीय मॅचवेळी अंपायरच्या निर्णयाला विरोध दर्षवल्याप्रकरणाचं आहे.

अंडरसननं चूक स्वीकारली 

आयसीसीचे मॅच रेफ्री अॅण्डी पायक्राफ्टनं दिलेल्या शिक्षेचा जेम्स अंडरसननं स्वीकार केला आहे. अंपायर कुमार धर्मसेना, जोएल विल्सन, थर्ड अंपायर ब्रुक्स ऑक्सेंफर्ड आणि चौथा अंपायर टीम रॉबिनसन यांनी अंडरसनवर आरोप केले होते.