विम्बल्डन : नवव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीचं विम्ब्लडनमधील आव्हान संपुष्टात आलंय. त्याला अठराव्या मानांकित स्पेनच्या रोबर्टो बाऊटीस्टा अॅगूटनं पराभूत केलं. रोबर्टोनं ही लढत 6-4, 7-6, 7-3, 3-6, 3-6 ने जिंकली.
बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काची विम्बल्डनमधील आगेकूच कायम आहे. तिनं चौथ्या राऊंडमधली आपला प्रवेश निश्चित केला. अझारेन्कानं ब्रिटनच्या हिटदर वॉट्सनचा 3-6, 6-1, 6-4 नं पराभव केला.
विम्बल्डनच्या मेन्स डबल्समधून भारताच्या रोहन बोपन्नालाही दुस-या राऊंडमध्येच एक्झिट घ्यावी लागली. बोपन्ना आणि त्याचा फ्रान्सचा पार्टनर एडवर्ड रॉजर वॅसेलिनला ब्रिटनच्या बिगरमानांकित केन स्कुपस्की आणि नील स्कुपस्कीकडून पराभव स्वीकारावा लागला. 7-6, 8-6, 6-7, 5-7, 6-3 नं बोपन्ना-रॉजर जोडीला पराभव सहन करावा लागला.
भारताच्या दिविज शरण आणि पुरव राजाचंही विम्बल्डनचं आव्हान संपुष्टात आलं. शरण-राजा जोडीला 3-6, 4-6, 6-4, 7-6, 8-10 नं पराभव सहन करावा लागला.