Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या संघात या घातक बॉलरची एन्ट्री

Mumbai Indian IPL 2023 : मुंबईच्या संघात 3 वर्षानंतर या बॉलरची एन्ट्री झाली आहे.

Updated: Nov 12, 2022, 11:36 PM IST
Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या संघात या घातक बॉलरची एन्ट्री title=

Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वीच संघ एक्शन मोडमध्ये आहेत. 16 डिसेंबरला होणाऱ्या लिलावापूर्वी खेळाडूंची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सने आरसीबी संघातील एका खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला आहे. हा खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी गेम चेंजर ठरु शकतो.

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ याला मुंबई इंडियन्स (MI) ने IPL सीझन 2023 पूर्वी खरेदी केले आहे. त्याला 2022 च्या आयपीएल लिलावात 75 लाखांच्या मूळ किमतीत आरसीबीने खरेदी केले होते, परंतु संपूर्ण स्पर्धेत त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

जेसन बेहरेनडॉर्फ तीन वर्षांनंतर मुंबई इंडियन्समध्ये परत येतत आहे. यापूर्वी तो 2018 आणि 2019 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. मुंबईसाठी 5 सामन्यात 8.68 च्या इकॉनॉमी रेटने 33.00 च्या सरासरीने पाच विकेट घेतल्या होत्या.

चेन्नई सुपर किंग्जचा होता भाग

जेसन बेहरेनडॉर्फ हा त्याचा सहकारी ऑस्ट्रेलियन जोश हेझलवुडच्या जागी 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा सदस्य होता. पण त्याला स्पर्धेच्या पहिल्या भागात खेळण्याची संधी मिळाली नाही आणि स्पर्धेचा दुसरा भाग संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडला तेव्हा हेझलवूड आपल्या संघात परतला होता. त्यानंतर 32 वर्षीय बेहरेनडॉर्फला RCB ने IPL 2022 साठी हॅझलवुड आणि इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली यांच्यासाठी बॅकअप म्हणून निवडले.