India vs Sri Lanka ODI Series : उद्यापासून भारतविरूद्ध श्रीलंका यांच्यामधील वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. दरम्यान ही सिरीज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला (India Cricket team) मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आगामी 3 सामन्यांच्या वनडे सिरीजमधून बाहेर पडला आहे.
दरम्यान यावेळी 3 सामन्यांच्या वनडे सिरीजमधून त्याला बाहेर का काढण्यात आलंय, याचं नेमकं कारण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांच्या मनात नवा प्रश्न निर्माण झालाय की, बुमराहला बाहेर ठेवण्यामागे नेमकं काय आहे.
बीसीसीआयने (BCCI) बुमराहसंदर्भात माहिती दिल्यानुसार, बुमराहला काही वेळ देण्यात आला आहे. बीसीसीआय त्याच्या कमबॅकसाठी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाहीये.
मुख्य म्हणजे, जसप्रीत बुमराह पहिल्या वनडे सामन्यासाठी टीमसोबत गुवाहाटीदेखील रवाना झाला नाही. शिवाय बीसीसीआयने बुमराहची रिप्लेसमेंट कोण असणार आहे, याबाबत देखील माहिती दिलेली नाही. मंगळवारी म्हणजेच उद्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार आहे.
यंदाचं वर्ष हे एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं वर्ष आहे. त्यामुळे बीसीसीआय कोणताही धोका पत्करुन इच्छित नाही. त्यामुळेच बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला दुखापतीतून पूर्णपणे बरं होण्याचा वेळ दिला जाणार आहे.
सप्टेंबर 2022 पासून जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे क्रिकेटापसून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत बुमराह शेवटचा खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला टीम बाहेर जावं लागलं. दुखापतीमुळे त्याला गेल्या वर्षी एशिया कप आणि टी20 वर्ल्ड कपही खेळता आला नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली, शुभमन गिल, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, हार्दिक पंड्या (उप कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.