IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, बेन स्टोक्सनंतर हा स्टार खेळाडू बाहेर

राजस्थान संघाला आणखी एक मोठा झटका

Updated: Apr 23, 2021, 08:22 PM IST
IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, बेन स्टोक्सनंतर हा स्टार खेळाडू बाहेर

मुंबई : आयपीएल 2021 मध्ये शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध झालेल्या सामन्याआधी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यावर्षी आयपीएलमध्ये खेळणार नाही. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) शुक्रवारी हे निवेदन प्रसिद्ध केले. वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे भारत विरुद्ध वनडे मालिका खेळू शकला नाही. यानंतर, तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर होता, परंतु तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी अष्टपैलू बेन स्टोक्स दुखापतीमुळे या हंगामात आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

निवेदनात म्हटलं की, आर्चर पुढील आठवड्यापासून त्याच्या काऊन्टी संघाबरोबर पूर्ण प्रशिक्षणात सहभागी होईल. इसीबी आणि मेडिकल टीम त्याच्या फिटनेसवर नजर ठेवेल. जर त्याला कोणतीही समस्या उद्भवली नाही तर दोन आठवड्यांनंतर तो क्रिकेट खेळण्यास सज्ज होईल. नंतर, उजव्या हाताच्या शस्त्रक्रियेनंतर त्याने सराव सुरु केला.

आर्चरच्या आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने या स्पर्धेच्या काही सामन्यांत तो नसल्याने नंतर तो येण्याची आशा व्यक्त केली होती. राजस्थान रॉयल्सचा कोच कुमार संगकारा याने म्हटलं होते की आर्चरची अनुपस्थिती संघासाठी 'मोठा धक्का' होता. दुखापतीतून सावरल्यानंतरं आपण संघासाठी उपलब्ध व्हावे अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली होती. ही स्पर्धा अद्याप संघासाठी चांगली ठरलेली नाही. चार पैकी तीन सामने गमावल्यानंतर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ पॉइंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.