IPL 2021: जादूगर जडेजानं केली मशहूर फलंदाजाची नक्कल, पाहा मजेशीर व्हिडीओ

रविंद्र जडेजानं कोणत्या फलंदाजाची नक्कल केली आहे तुम्ही ओळखू शकता का? पाहा व्हिडीओ

Updated: Apr 23, 2021, 05:43 PM IST
IPL 2021: जादूगर जडेजानं केली मशहूर फलंदाजाची नक्कल, पाहा मजेशीर व्हिडीओ

मुंबई: नुकताच राजस्थान रॉयल्स संघातील गोलंदाज श्रेयस गोपाळनं बुमराह, आर अश्विन आणि हरभजन सिंह यांच्या बॉलिंग स्टाईलची नक्कल केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता चेन्नई सुपरकिंग्स संघातील रविंद्र जडेजाचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

रविंद्र जडेजानं स्टार फलंदाजाची नक्कल एकदम अनोख्या अंदाजात केली आहे. ही नक्कल पाहून एक क्षण सर्वांना हसू आलं. रविंद्र जडेजानं कोणाच्या स्टाइलची नक्कल केली ओळखा पाहू? असं कॅप्शन देत चेन्नई सुपरकिंग्सने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by WhistlePoduArmy® CSK Fan Club (@cskfansofficial)

ऑलराऊंडर रविंद्र जडेजानं फाफ ड्युप्लेसीची नक्कल केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सीएसके सलामीवीर फाफ डू प्लेसिसने केकेआरविरुद्ध नाबाद 60 चेंडूमध्ये 95 धावांची खेळी केली. शतक हुकलं मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 4 षटकार देखील ठोकले. सीएसकेने 20 षटकांत 220 धावा केल्या आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. या खेळीनंतर दिग्गज आणि सहकारी खेळाडूंनीही डुप्लेचे कौतुक केले. 

चेन्नई सुपरकिंग्स संघ दिल्ली विरुद्धचा पहिला सामना वगळता तिन्ही सामने जिंकलं आहे. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब सोबतचा सामना जिंकण्यात यश मिळालं आहे. आता 25 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामना आहे. पॉइंट टेबलवर या दोन्ही संघांमध्ये चुरस तर आहेच पण मैदानाही आता ही जिंकण्याची चुरस 25 एप्रिल रोजी पाहायला मिळणार आहे.