जॉस बटलर वक्तव्याची रोहित शर्माला धास्ती; म्हणतो, 'या' खेळाडूसाठी वर्ल्ड कपचे दरवाजे बंद नाहीत

Jos Buttler, World Cup 2023 : हॅरी ब्रूकला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने विश्वचषक स्पर्धेच्या संघातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अशातच आता इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलर याने मोठं वक्तव्य केलंय.

Updated: Aug 26, 2023, 05:50 PM IST
जॉस बटलर वक्तव्याची रोहित शर्माला धास्ती; म्हणतो, 'या' खेळाडूसाठी वर्ल्ड कपचे दरवाजे बंद नाहीत title=
Jos Buttler Claims Harry Brook Might Have Chance To Play World Cup 2023

Jos Buttler on Harry Brook: आगामी वर्ल्ड कपसाठी (World Cup 2023) इंग्लंडच्य़ा संघाची घोषणा झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 15 खेळाडूंचा प्राथमिक संघ जाहीर केला आहे. जॉस बटलरच्या (Jos Buttler) खांद्यावर वनडे वर्ल्ड कपची जबाबदारी देण्यात आली आहे. तर संघात आघाडीचा फलंदाज हॅरी ब्रुक (Harry Brook) याला स्थान देण्यात आलं नाही. हॅरी ब्रूकने इंग्लंडच्या संघाकडून खेळताना कसोटी आणि टी-20 मध्ये धडाकेबाजी खेळी केल्या आहेत. असं असताना देखील हॅरी ब्रूकला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने विश्वचषक स्पर्धेच्या संघातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अशातच आता इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलर याने मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला जॉस बटलर?

खेळाडूंना विमानात बसण्यासाठी अजून बराच वेळ आहे त्यामुळे आम्ही वाट पाहू, असं वक्तव्य जॉस बटलर याने केलं आहे. आम्ही काय होते ते पाहू. आपल्या सर्वांना माहित आहे की हॅरी एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो काय करू शकतो हे आपण अलीकडे पाहिलं आहे. त्याचा खेळ आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे असं नाही. तो किती शक्तिशाली खेळाडू आहे हे आम्हाला माहीत आहे, असं म्हणत बटलरने ब्रुकचं (Jos Buttler on Harry Brook) कौतुक केलंय.

सध्या तरी हॅरी ब्रुकला संघात स्थान न मिळणं दुर्दैवी होतं. बेन स्टोक्सचे पुनरागमन आणि फलंदाज म्हणून त्याची उपलब्धता यामुळे परिस्थिती थोडी बदलली. बेन हा अप्रतिम खेळाडू आहे. अशा स्थितीत निवडीचा निर्णय घेणं खरोखरच अवघड आहे, असं म्हणत बेन स्टोक्सने ब्रुकला संधी का मिळाली नाही? याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा - 18 चेंडूत 86 धावा! World Cup संघातून वगळल्यानंतर त्याने निवड समितीला दाखवला आरसा

इंग्लंडचा संघ (England Squad) : 

जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस एटकिन्सन, जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियम लिविंगस्टन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉप्ले, डेविड विली, मार्क वूड, क्रिस वोक्स.