BAN vs IND: टीम इंडियाचा (Team India) युवा खेळाडू ईशान किशानने (Ishan Kishan) तिसऱ्या सामन्यात तुफान फलंदाजी करत डबल सेंच्युरी (Double Century) झळकावली आहे. हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात चांगला दिवस होता. 24 वर्षांच्या खेळाडूने आज असा कारनामा केला आहे, जो प्रत्येकाच्या लक्षात राहण्यासारखा आहे. बागंलादेश आणि भारत (IND vs BAN 3rd ODI) यांच्याविरूद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 126 बॉल्समध्ये त्याने तुफान द्विशतक जडलं आहे. दरम्यान या सामन्यानंतर त्याने सेलेब्रेट केलेल्या आनंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय.
Ishan Kishan ने 126 बॉल्समध्ये ठोकलं शतक
या सामना पाहताना चाहत्यांना आफर आनंद झालाय. ईशान किशनने हा द्विशक मारत इतिहास रचताना वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलला देखील मागे टाकलं आहे. गेलने 138 बॉल्समध्ये त्याचं द्विशतक पूर्ण केलं होतं. तर किशनने केवळ 126 बॉल्समध्ये ही कामगिरी केल्याने तो गेलचा रेकॉर्ड मोडलाय.
द्विशतक पूर्ण करण्यासाठी ईशान किशनने एक सिंगल रन घेतला. हा सिंगल रन काढल्यानंतर नॉन स्ट्रायकल एंडला पोहोचल्यावर त्याने हेल्मेट काढलं आणि धावत पुढे जाऊन एक उंच उडी घेत आनंद साजरा केला. यावेळी एका हातात हेल्मेट आणि एका हातात बॅट घेऊन त्याने मैदानाला एक चक्करही मारली. यावेळी त्याच्या सोबत खेळत असलेल्या विराट कोहलीने येऊन ईशान किशनला मिठी मारली.
Virat Kohli celebrated first before Ishan Kishan when the youngster scored his memorable double hundred.#ishankishan pic.twitter.com/pTz8NqT9fG
— Adnan Ansari (@AdnanAn71861809) December 10, 2022
बांगलादेश (bangladesh) विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने (ishan kishan) द्विशतक ठोकले आहे. हे द्विशतक करून तो 210 धावांवर आऊट झाला. या या खेळीत त्याने 24 फोर आणि 10 सिक्स मारले आहेत. त्याच्या या खेळीने टीम इंडिया सर्वांच्च धावसंख्येपर्यंत पोहोचली आहे.
रोहितने (Rohit sharma) वनडे सामन्यात तीनदा सर्वांच्च स्कोर केला आहे. यामध्ये त्याने एकदा 208 तर दुसऱ्यांदा 209 धावा ठोकल्या होत्या. तर ईशान किशनने (ishan kishan) बांगलादेश विरूद्ध डबल सेंच्यूरी (Double Century) ठोकून रोहितचा रेकॉर्ड मोडला आहे.ईशानने 160 च्या स्ट्राईकने 210 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे ईशानने 208 आणि 209 धावा ठोकल्याचा विक्रम मोडलाय. विशेष म्हणजे 131 इनिंग्समध्ये त्याने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. तर रोहितने 153 इनिंगमध्ये डबल सेंच्यूरी ठोकली होती.