आणखी एका क्रिकेटपटूची विकेट! करुण नायर विवाहबंधनात

भारताचा क्रिकेटपटू करुण नायर हा विवाहबंधनात अडकला आहे.

Updated: Jan 20, 2020, 11:27 PM IST
आणखी एका क्रिकेटपटूची विकेट! करुण नायर विवाहबंधनात

बंगळुरू : भारताचा क्रिकेटपटू करुण नायर हा विवाहबंधनात अडकला आहे. गर्लफ्रेंड सनाया तानकरीवालासोबत करुण नायरचं उदयपूरमध्ये लग्न झालं. श्रेयस अय्यर, वरुण एरॉन, युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर आणि अजिंक्य रहाणे या भारतीय क्रिकेटपटूंनी करुण नायरच्या लग्नाला हजेरी लावली. भारतीय क्रिकेटपटूंनी करुण नायरच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

To a lifetime of love and happiness !! @sanayatankariwala @karun_6

A post shared by Varun Aaron (@varunaaron77) on

मागच्यावर्षी जून महिन्यात करुण नायरने सनायासोबत साखरपुडा झाल्याचं घोषित केलं होतं. इन्स्टाग्रामवर करुणने साखरपुड्याचे फोटो शेयर केले होते. राजस्थानमध्ये जन्मलेला २८ वर्षांचा करुण नायर हा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून खेळत आहे. डिसेंबर २०१६ साली करुण नायरने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध टेस्टमध्ये त्रिशतक केलं होतं. टेस्टमध्ये सेहवागनंतर त्रिशतक करणारा करुण हा दुसरा भारतीय आहे.

k4a0l41o

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Lovelies  @karun_6 @sanayatankariwala #TheNairWalas #karunnair #sanayatankariwala . @made.in.mono

A post shared by Karun Nair (@karunnair_303) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@karun_6 @sanayatankariwala ! #TheNairWalas #karunnair #sanayatankariwala #weddingreception #love #smile 

A post shared by Karun Nair (@karunnair_303) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Sanaya Tankariwala (@sanayatankariwala) on

त्रिशतक केल्यानंतरही करुण नायर टीम इंडियाकडून फार खेळला नाही. मार्च २०१७ मध्ये करुण ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज खेळला होता, यानंतर तो भारतीय टीममध्ये दिसला नाही. ६ टेस्ट मॅचमध्ये नायरने एकूण ३७४ रन केले. २ वनडे मॅचमध्ये नायरने ४६ रन केले आहेत.