KBC मध्ये क्रिकेटवर विचारण्यात आला 50 लाखांचा प्रश्न, पाहा तुम्हाला उत्तर येतंय का?

KBC 50 Lakhs Question On Cricket : केबीसीमध्ये गुरुवारी एपिसोड दरम्यान स्पर्धकाला क्रिकेट विषयी एक प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न तब्बल 50 लाखांची होता, परंतु स्पर्धकाला त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पुजा पवार | Updated: Sep 27, 2024, 01:50 PM IST
KBC मध्ये क्रिकेटवर विचारण्यात आला 50 लाखांचा प्रश्न, पाहा तुम्हाला उत्तर येतंय का?  title=
(Photo Credit : Social Media)

KBC 50 Lakhs Question On Cricket : कौन बनेगा करोडपती हा असा एक शो आहे ज्याच्या माध्यमातून स्पर्धक केवळ ज्ञानाच्या जोरावर लखपती आणि करोडपती होऊ शकतात. दरवर्षी अनेक स्पर्धक या शोमध्ये सहभाग नोंदवतात. यंदा कौन बनेगा करोडपती या शो चा 16 वा सीजन असून यात आलेलं स्पर्धक हॉट सीटवर बसून प्रश्नांची अचूक उत्तर देऊन पैसे जिंकत आहेत. केबीसीमध्ये गुरुवारी एपिसोड दरम्यान स्पर्धकाला क्रिकेट विषयी एक प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न तब्बल 50 लाखांची होता, परंतु स्पर्धकाला त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

गुरुवारी टेलिकास्ट झालेल्या कौन बनेगा करोडपतीच्या एपिसोडमध्ये होत सीटवर अभिषेक संधू हा स्पर्धक बसला होता. त्याने 25 लाखांपर्यंत योग्य उत्तर देत मजल मारली. परंतु अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकला नाही. मूळचे हरियाणा येथील असलेले अमिताभ बच्चन हे सरकारी खात्यात रोजगार अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. अमिताभ बच्चन यांनी अभिषेक संधूला 50 लाखांसाठी क्रिकेट विषयक प्रश्न विचारला. 

50 लाखांसाठी विचारण्यात आला प्रश्न : 

अभिषेक संधू यांना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणात द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज कोण आहे?  हा प्रश्न 50 लाखांसाठी विचारण्यात आला. या प्रश्नासाठी त्याला A.आर्थर श्रूस्बरी   B.डब्ल्यूजी ग्रेस  C.डग इनसोल  D.टॉम मार्सडेन असे पर्याय देण्यात आले. परंतु अभिषेक याला योग्य उत्तर देता न आल्याने त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि 25 लाख रुपये जिंकले. 

हेही वाचा : DWAYNE BRAVO: रिटायरमेंटच्या काही तासांतच नव्या जबाबदारीची घोषणा, धोनीची साथ सोडून आता 'या' टीममध्ये...

 

काय आहे उत्तर? 

अभिषेकला विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय D.टॉम मार्सडेन असे आहे. टॉम मार्सडेन हा इंग्लंडचा फलंदाज असून त्याने 1826 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये Sheffield and Leicester या टीमसाठी Nottingham विरुद्ध खेळताना पहिल्या इनिंगमध्ये 227 धावांची कामगिरी केली होती.  केबीसी स्पर्धक अभिषेकने विक्रांत मॅसी स्टारर '12th Fail' मधील त्याचे अनुभव सांगितले. या चित्रपटातील व्यक्तिरेखेप्रमाणे तोही संघर्ष करत अधिकारी बनल्याचे त्याने सांगितले.