रिटायरमेंटच्या काही तासांतच नव्या जबाबदारीची घोषणा, धोनीची साथ सोडून आता 'या' टीममध्ये...

Dwayne Bravo KKR Mentor : ब्रावोने गुरुवारी रात्री क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. आयपीएल 2024 मध्ये ब्रावो चेन्नई सुपरकिंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता.

पुजा पवार | Updated: Sep 27, 2024, 03:14 PM IST
रिटायरमेंटच्या काही तासांतच नव्या जबाबदारीची घोषणा, धोनीची साथ सोडून आता 'या' टीममध्ये... title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 Dwayne Bravo  KKR Mentor: आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व फ्रेंचायझींमध्ये संघ बांधणीबाबत मोठ्या हालचाली सुरु आहेत. अनेक फ्रेंचायझी त्यांच्या टीमच्या सपोर्ट स्टाफमध्येही बदल करत असून शुक्रवारी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स या टीमने मोठा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीरची भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यावर केकेआरचे (Kolkata Knight Riders) मेंटॉर पद रिक्त होते. शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सने वेस्टइंडीजचा माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर ड्वेन ब्रावोला (Dwayne Bravo) मेंटॉर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली.

ड्वेन ब्रावो यापूर्वी आयपीएलमध्ये सुद्धा खेळाला आहे. आयपीएल 2024 मध्ये ब्रावो चेन्नई सुपरकिंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. तसेच तो चेन्नई सुपरकिंग्सचा माजी क्रिकेटर सुद्धा राहिला आहे. ड्वेन ब्रावो हा एम एस धोनीचा खास मित्र सुद्धा आहे त्यामुळे त्याने चेन्नई आणि धोनीची साथ सोडून केकेआरमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने फॅन्स आश्चर्य व्यक्त करत आहेत. केवळ आयपीएलमध्येच नाही तर कोलकाता नाईट रायडर्स ही फ्रेंचायझी भाग घेत असलेल्या जगभरातील सर्व लीगमध्ये नाईट रायडर्स टीमचा मेंटॉर हा ब्रावो असेल.  

हेही वाचा : ऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

ड्वेन ब्रावोने केली निवृत्तीची घोषणा : 

केकेआरचा मेंटॉर होण्यापूर्वी 4 तास आधी ब्रावोने गुरुवारी रात्री क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्यात त्याने म्हंटले की, ' मनापासून त्याला अजून खेळावंसं वाटतंय परंतु त्याचे शरीर आता परवानगी देत ​​नाही'. ब्रावोच्या नावावर टी २० इतिहासातील सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने 582 सामन्यात एकूण 631 विकेट्स घेतले आहेत. याच वर्षी कॅरिबियाई प्रीमियर लीगमध्ये ब्रावोला ग्रोइन इंजरी झाली होती. सोशल मीडियावर पोस्ट करून ड्वेन ब्रावोने निवृत्तीची घोषणा केली. यात त्याने म्हंटले की,  "प्रिय क्रिकेट, आजच्या दिवशी मी त्या खेळाला निरोप देतो ज्याने मला सर्व काही दिले आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून, मला माहित होते की मला हेच करायचे आहे. हा खेळ मला खेळायचा होता. मला इतर कशातही रस नव्हता आणि मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी दिले. त्या बदल्यात, तू मला माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मी स्वप्नात पाहिलेले जीवन दिले. त्यासाठी मी तुझे किती आभार मानू."