मुंबई : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. जेव्हापासून हा प्रकार सापडला तेव्हापासून जगभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारताने दक्षिण आफ्रिकेला मदत करण्याची घोषणा केली असून लस देण्याबाबत बोलणं झालं आहे. भारताच्या या निर्णयावर इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने प्रतिक्रिया दिली आहे.
माजी फलंदाज भारताच्या या निर्णयाचं कौतुक केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. भारत सरकारच्या निर्णयावर केविन पीटरसनने लिहिलं की, भारताने पुन्हा एकदा संवेदना दाखवली आहे. सर्वोत्तम देश, चांगल्या मनाची लोकं राहतात. धन्यवाद नरेंद्र मोदी.
भारत सरकारकडून अशी घोषणा करण्यात आली आहे की, ज्या आफ्रिकन देशांमध्ये ओमिक्रॉन प्रकाराचे संकट वेगाने वाढतंय तिथे मेड इन इंडिया लसीचा पुरवठा केला जाईल. द्विपक्षीय संबंधांच्या आधारावर किंवा COVAXच्या आधारावर लसींचा पुरवठा केला जाऊ शकतो. COVAX हे WHO द्वारे चालवलेले एक मिशन आहे.
That caring spirit once again shown by India!
The most fabulous country with so many warm hearted people!
Thank you!
cc @narendramodi https://t.co/r05631jNBD— Kevin Pietersen (@KP24) November 29, 2021
केविन पीटरसन इंग्लंडकडून क्रिकेट खेळला आहे. त्याचा जन्मही दक्षिण आफ्रिकेत झाला. पीटरसन निवृत्तीनंतरही भारतात येत राहतो, मग ती आयपीएल असो किंवा इतर सामन्यांमध्ये कॉमेंट्री असो. याशिवाय केविन पीटरसन आसाममध्ये राइनोजसाठीही काम करतो.
जेव्हा भारतीय संघ टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही, तेव्हा त्याच्यावर टीका होत होती. त्यावेळी केविन पीटरसनने भारतीय क्रिकेट संघाचं समर्थन केलं होतं. हिंदीत ट्विट करून खेळाडूंना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं.