IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सचा धक्कादायक निर्णय! तब्बल 12 स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

KKR released players list : कोलकाता नाइट रायडर्सने दोन्ही खेळाडूंना कायम ठेवून आपल्या जुन्या शूरवीरांवर विश्वास दाखवला आहे. दरम्यान, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांना बाहेरचा दरवाजा दाखवण्यात आला आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Nov 26, 2023, 05:53 PM IST
IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सचा धक्कादायक निर्णय! तब्बल 12 स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता title=
KKR released players list

Kolkata Knight Riders released players list : आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024 auction) सामील होणाऱ्या सर्व संघांना आज (26 नोव्हेंबरपर्यंत) कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे सादर केली आहे. सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांच्या भवितव्यावर बरीच अटकळ बांधल्यानंतर, कोलकाता नाइट रायडर्सने दोन्ही खेळाडूंना कायम ठेवून आपल्या जुन्या शूरवीरांवर विश्वास दाखवला आहे. दरम्यान, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांना बाहेरचा दरवाजा दाखवण्यात आला आहे. 

KKR ने रिलीज केलेले खेळाडू

शाकिब अल हसन, लिटन दास, आर्या देसाई, डेव्हिड विसे, शार्दुल ठाकूर, नारायण जगदेसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साऊदी, जॉन्सन चार्ल्स.

कोणत्या खेळाडूंना ठेवलं कायम?

नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा.

दरम्यान, कोलकाता नाईटरायडर्सने अष्टपैलू खेळाडून शार्दुल ठाकूर याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. शार्दुल ठाकूरला केकेआरने २०२३ च्या लिलावामध्ये तब्बल १०.७५ कोटी रुपये मोजून खरेदी केले होते. त्यामुळे शार्दुलला रिलीज केल्याने केकेआरच्या पर्समध्ये १०.७५ कोटी रुपये जमा झाले आहे.