लोकेश राहुलचे या अभिनेत्रीसोबतचे चॅट व्हायरल

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला. 

Updated: Jul 4, 2018, 08:55 PM IST
लोकेश राहुलचे या अभिनेत्रीसोबतचे चॅट व्हायरल title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला. लोकेश राहुल आणि कुलदीप यादव हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतानं पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. आणि २० ओव्हरमध्ये इंग्लंडला १५९ रनवर रोखलं. भारताचा स्पिनर कुलदीप यादवनं इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या. यानंतर १६० रनचा पाठलाग करताना भारतानं ८ विकेटनं विजय मिळवला. लोकेश राहुलनं या मॅचमध्ये शतक झळकवलं. लोकेश राहुलच्या या शतकानंतर पुन्हा एकदा राहुलचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.

लोकेश राहुल आणि अभिनेत्री निधी अग्रवालसोबतच्या संबंधांवरून उठलेल्या अफवांवर राहुलनं काहीच दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता राहुलचं नाव अभिनेत्री सोनम बावजासोबत जोडलं जात आहे. सोनम ही पंजाबी चित्रपटातली अभिनेत्री आहे. सोनम आणि लोकेश राहुल यांच्यामधलं सोशल नेटवर्किंगवरचं चॅट सध्या व्हायरल होत आहे.

सूर्यास्त बघत आहे आणि तुझ्याबद्दल विचार करत आहे, असं लिहून सोनमनं एक फोटो पोस्ट केला होता. या फोटवर राहुलनं कमेंट केली. फक्त एक कॉल सोनम बाजवा, अशी कमेंट राहुलनं केली. यानंतर हृदयाची इमोजी पाठवून सोनमनं रात्री डेटला जाऊया का, असं विचारलं. 

 

Watching sunset and thinking of you

A post shared by Sonam Bajwa (@sonambajwa) on

kl rahul punjabi actress sonam bajwa

kl rahul punjabi actress sonam bajwa

याआधी एलिक्जिर नाहर आणि निधी अग्रवाल सोबत राहुलचे फोटो व्हायरल झाले होते. मी आणि निधी आधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मी क्रिकेटर बनण्याआधी आणि ती अभिनेत्री बनण्याआधीपासूनच आम्ही एकमेकांना ओळखतो. मुलगा आणि मुलगी फक्त मित्र असू शकत नाही का? अशी प्रतिक्रिया राहुलनं दिली होती.