श्रीलंकेविरुद्धच्या वनडेसाठी टीम इंडिया जाहीर, कोहलीला विश्रांती

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर करण्यात आलीये. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 27, 2017, 04:52 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या वनडेसाठी टीम इंडिया जाहीर, कोहलीला विश्रांती title=

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर करण्यात आलीये. 

या मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलीये. तर रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलेय. या मालिकेत सिद्धार्थ कौल या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आलीये.

दरम्यान, तिसऱ्या कसोटीत मात्र विराट कोहली खेळणार आहे. त्यानंतर त्याला विश्रांती देण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. दुसऱ्या कसोटीत न खेळणाऱा शिखर धवन तिसऱ्या कसोटीत पुन्हा संघात परततोय. दोन डिसेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होतेय 

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया - विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमन साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, उमेश यादव, इशांत शर्मा, विजय शंकर

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा( कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एम एस धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरहा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल. 

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या व्यस्त वेळापत्रकाबाबत विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली होती. विराट कोहली आयपीएलनंतर सतत क्रिकेट खेळतोय. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ लगेचच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे कोहलीला पुरेशी विश्रांतीही मिळालेली नाहीये. याच कारणामुळे बीसीसीआयने मालिकेतील पुढील सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय.