विराटने युवराज आणि सुरेश रैनाला कायमचे घरी बसवले- कमाल खान

ट्विटरच्या माध्यमातून लोकांवर टीका करणारा आणि त्यातून  सतत वादांमध्ये अडकणारा कमाल खान आता भारतीय खेळांडूंवरही 'घसरला' आहे.

Updated: Oct 15, 2017, 06:17 PM IST
विराटने युवराज आणि सुरेश रैनाला कायमचे घरी बसवले- कमाल खान  title=

मुंबई : ट्विटरच्या माध्यमातून लोकांवर टीका करणारा आणि त्यातून  सतत वादांमध्ये अडकणारा कमाल खान आता भारतीय खेळांडूंवरही 'घसरला' आहे.

शनिवारी भारत- न्युझिलंड सामन्यासाठी खेळाडूंची घोषणा करण्यात आली. जाहीर झालेल्या संघामध्ये युवराज सिंग आणि सुरेश रैना या दोन खेळाडूंचा समवेश नाही. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या दोघांचे करिअर संपवले आता कॉमेंट्री करा असा सल्लादेखील कमाल खानने दिला आहे. 

कमाल खान हे ट्विट केल्यानंतर कोणत्याही खेळाडूने प्रतिक्रिया दिली नसली तरीही ट्विटरकरांनी मात्र कमाल खानला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. 

भारतीय खेळाडूंवर ट्विटरच्या माध्यमातून टीका करायची ही पहिली वेळ नव्हे. याआधीदेखील आयपीएलच्या दहाव्या पर्वामध्ये विराट कोहलीवर टीका केली होती.