पाहा, या चिमुकल्या सरदाराचा व्हिडिओ का होतोय व्हायरल

मॅच टाय झाल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेला हा चिमुरडा रडताना दिसला होता

Updated: Sep 26, 2018, 02:30 PM IST
पाहा, या चिमुकल्या सरदाराचा व्हिडिओ का होतोय व्हायरल  title=

मुंबई : आशिया कप 2018 मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान मॅचमध्ये अफगाणिस्तानच्या कमी अनुभवी आणि तरुण धुरंधरांच्या खेळामुळे ही मॅच टाय राहिली... भारतासमोर 253 रन्सचं टार्गेट होतं... परंतु, भारत 49.5 ओव्हरमध्ये 252 रन्सवर आऊट झालं... आणि ही मॅच टाय राहिली... यामुळे निराश झालेल्या एका छोट्या सरदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय... 

मॅच टाय झाल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेला हा चिमुरडा रडताना दिसला होता... हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर हरभजन सिंहनं आपल्या ट्विटर हॅन्डलवर या मुलाचा एक फोटो शेअर करून लिहिलंय 'कोई ना पुत्त रोना नही है फायनल आपा जीतेंगे' तर भुवनेश्वर कुमारनंही फोन करून या चिमुरड्याशी संवाद साधला.

 

Harbhajan Singh

 

या मुलाच्या वडिलांना ट्विट करून हरभजन सिंह आणि भुनेश्वरचे आभार मानलेत. 

 

Bhuvneshwar Kumar

 

हा चिमुरडा दुबईत महेंद्र सिंग धोनी अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतोय.