U19 World Cup Final Live : टीम इंडियाला पराभवाच्या उंभरठ्यावर, आदर्श सिंगची एकाकी झुंज संपुष्टात

IND vs AUS World Cup 2024 Final Live Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत. भारताने यापूर्वी U19 चा वर्ल्डकप हा पाचवेळा जिंकला आहे. 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये भारताने विजतेपद पटकावले होते. आज पुन्हा भारत इतिहास रचणार का?    

U19 World Cup Final Live :  टीम इंडियाला पराभवाच्या उंभरठ्यावर, आदर्श सिंगची एकाकी झुंज संपुष्टात

IND vs AUS ICC U19 World Cup Final Updates In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) सलग दुसऱ्या वर्षी वर्ल्डकप फायनल खेळणार आहेत. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत कर्णधार रोहित शर्माच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. आता 19 वर्षाखालील भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. 

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन -

भारत अंडर-19 :- आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन  (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्या पांडे.

ऑस्ट्रेलिया अंडर-19 :- हॅरी डिक्सन, सॅम कॉन्स्टास, ह्यू वॅबगेन (कर्णधार), हरजुस सिंग, रायन हिक्स (यष्टीरक्षक), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राल्फ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महाली बेर्डमन आणि कॅलम विडलर. 

11 Feb 2024, 19:58 वाजता

टीम इंडियाला आता पराभवाच्या उंभरठ्यावर असून पहिल्या ओव्हरपासून मैदानात पाय रोवणारा आदर्श सिंग बाद झाला आहे. आदर्श सिंगची 47 धावांची एकाकी झुंज संपुष्टात आली.

11 Feb 2024, 19:38 वाजता

टीम इंडिया पराभवाच्या उंभरठ्यावर पोहोचली आहे. प्रियांशू मोलिया 9 धावा करून झेलबाद झाल्यानंतर लगेचच अरावेली अवनीश देखील शुन्यावर बाद झालाय.

11 Feb 2024, 19:16 वाजता

टीम इंडियाला बॅक टू बॅक दोन धक्के बसले आहेत. कॅप्टन उदय सहारन बाद झाल्यानंतर सचिन दास देखील मैदानात टिकला नाही. सचिन दास 8 बॉलमध्ये 9 धावा करत बाद झाला.

11 Feb 2024, 18:48 वाजता

IND vs AUS 2nd Wicket : ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासमोर टीम इंडियाचे खेळाडू कडवी झुंज देत असल्याचं पहायला मिळतंय. टीम इंडियाला दुसरा धक्का बसला असून महत्त्वाचा फलंदाज मुशीर खान 22 धावा करत बाद झाला.

11 Feb 2024, 17:51 वाजता

IND vs AUS 1st Wicket : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 254 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज आर्शिन कुलकर्णी फक्त 3 धावा करून बाद झाला.

11 Feb 2024, 17:11 वाजता

ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 50 ओव्हरमध्ये 253/7

अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारत विरुद्ध 50 षटकात 253 धावा केल्या आहेत. भारताला विजेतेपदासाठी 254 धावा कराव्या लागतील. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगने सर्वाधिक 55 धावांची खेळी खेळली. तर कर्णधार वेबगेनने 48 धावा केल्या. मात्र, त्याचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही. सलामीला आलेला हॅरी डिक्सनही 42 धावा करून बाद झाला. याशिवाय ऑलिव्हर पीक 46 धावांवर नाबाद राहिला आणि टॉम स्ट्रेकर 8 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले तर नमन तिवारीने 2 बळी घेतले. याशिवाय सौम्या पांडे आणि मुशीर खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले. आता भारतीय संघ दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे. 

11 Feb 2024, 16:52 वाजता

चार्ली अँडरसन बाद होऊन ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला. 18 चेंडूत 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राज लिंबानी त्याला बाद केले. टॉम स्ट्रेकर नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. 46 षटके पूर्ण झाल्यावर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 गडी गमावून 223 धावा आहे.

11 Feb 2024, 16:23 वाजता

हरजस सिंगनंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला राफे मॅकमिलन 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मुशीर खानने त्याला झेलबाद केले. 40 षटकांचा खेळ पूर्ण झाला, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सहा विकेटवर 187 धावा. चार्ली अँडरसन आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.

11 Feb 2024, 15:56 वाजता

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 35व्या षटकातील पहिल्या चेंडूवर राज लिंबानीने रायन हिक्सला बाद केले. 20 धावा करून यष्टिरक्षक फलंदाज बाद झाला. हरजस सिंग आणि हिक्स यांच्यात चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी झाली. सहाव्या क्रमांकावर ऑलिव्हर पीक फलंदाजीला आला आहे.

11 Feb 2024, 15:09 वाजता

ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे. सेटचा फलंदाज हॅरी डिक्सन 42 धावा करून बाद झाला. नमन तिवारीने त्याला मुरुगन अभिषेककरवी झेलबाद केले. भारतीय गोलंदाजाला दोन यश मिळाले आहे. 23 षटकांचा खेळ संपला आणि ऑस्ट्रेलियाला तीन धक्के बसले.