U19 World Cup Final Live : टीम इंडियाला पराभवाच्या उंभरठ्यावर, आदर्श सिंगची एकाकी झुंज संपुष्टात

IND vs AUS World Cup 2024 Final Live Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत. भारताने यापूर्वी U19 चा वर्ल्डकप हा पाचवेळा जिंकला आहे. 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये भारताने विजतेपद पटकावले होते. आज पुन्हा भारत इतिहास रचणार का?    

U19 World Cup Final Live :  टीम इंडियाला पराभवाच्या उंभरठ्यावर, आदर्श सिंगची एकाकी झुंज संपुष्टात

IND vs AUS ICC U19 World Cup Final Updates In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) सलग दुसऱ्या वर्षी वर्ल्डकप फायनल खेळणार आहेत. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत कर्णधार रोहित शर्माच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. आता 19 वर्षाखालील भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. 

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन -

भारत अंडर-19 :- आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन  (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्या पांडे.

ऑस्ट्रेलिया अंडर-19 :- हॅरी डिक्सन, सॅम कॉन्स्टास, ह्यू वॅबगेन (कर्णधार), हरजुस सिंग, रायन हिक्स (यष्टीरक्षक), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राल्फ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महाली बेर्डमन आणि कॅलम विडलर. 

11 Feb 2024, 14:12 वाजता

ऑस्ट्रेलियन संघाने आठ ओव्हरमध्ये 43 धावा केल्या आहेत. हॅरी डिक्सन 19 चेंडूत 21 आणि कर्णधार वायबगेन 21 चेंडूत 15 धावा करून नाबाद आहे. पहिला विकेट पडल्यानंतर दोघांनीही सावध फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली.

11 Feb 2024, 13:48 वाजता

 भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. राज लिंबानी यांनी भारताला पहिले यश मिळवून दिले आहे. ऑस्ट्रेलियाने तीन षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 19 धावा केल्या आहेत. हॅरी डिक्सन नाबाद 15 आणि वायबगेन तीन धावांवर नाबाद आहेत.

11 Feb 2024, 13:33 वाजता

अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची खेळी सुरू झाली असून  हॅरी डिक्सन आणि सॅम कॉन्स्टास क्रीजवर आहेत. राज लिंबानीने भारताकडून गोलंदाजी सुरुवात केली आहे.  

 

11 Feb 2024, 13:22 वाजता

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल.