IPL 2023 PBK vs KKR LIVE : लिव्ह सामन्यात पावसाचा खेळ, सामना थांबवला

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : पंजाब (Punjab Kings) आणि कोलकाता (Kolkata Knight Riders) यांच्यात आज सामना रंगणार आहे. मात्र हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

IPL 2023 PBK vs KKR LIVE :  लिव्ह सामन्यात पावसाचा खेळ, सामना थांबवला

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : संपूर्ण क्रिडा विश्वाचं लक्ष लागलेल्या इंडियन प्रिमियर लीग (IPL 2023) स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. 16 व्या सिझनच्या पहिल्या विजयाचा मान पंड्याचा गुजरातला मिळाला आहे. गुजरातने चेन्नईवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. तर आज क्रीडा प्रेमींसाठी धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे. 

1 Apr 2023, 15:10 वाजता

KKR vs PBKG: कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.(Kolkata Knight Riders have won the toss and have opted to field)

1 Apr 2023, 14:54 वाजता

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : पंजाब किंग्ज : संभाव्य प्लेईंग 11 
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ऋषी धवन, सॅम कुरान, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर.

1 Apr 2023, 14:52 वाजता

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : कोलकाता नाईट रायडर्स : संभाव्य प्लेईंग 11 

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

1 Apr 2023, 14:50 वाजता

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये कोलकाता संघाने पंजाबवर वर्चस्व राखलं आहे. पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने 20 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सला फक्त 10 सामने जिंकले आहेत. 

1 Apr 2023, 14:47 वाजता

 IPL 2023 PBKs vs KKR LIVE :  या सामन्यावर पावसाचं संकट आहे. पावसामुळे पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान होणारा सामना रद्द होऊ शकतो. हवामान विभागानेच पावसाचा इशारा दिला आहे. 

1 Apr 2023, 14:46 वाजता

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : मोहालीतील आयएस ब्रिंदा स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. पंजाब किंग्स शिखर धवनच्या तर कोलकाला नाईट रायडर्स नितीश राणाच्या नेतृत्वात लढतीसाठी उतरणार आहे.