IPL 2025 Mega Auction LIVE: IPL Auction 2025 Live: अर्जुन तेंडुलकरवर 30 लाखांची बोली; मुंबई इंडियन्सने 30 लाखात ताफ्यात सामील करून घेतले

IPL 2025 Mega Auction LIVE Updates in Marathi: सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. या 72 खेळाडूंवर एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आज कोणावर बोली लागणार आणि कोणत्या खेळाडूवर किती पैसे लागणार हे जाणून घेऊयात. 

IPL 2025 Mega Auction LIVE: IPL Auction 2025 Live: अर्जुन तेंडुलकरवर 30 लाखांची बोली;  मुंबई इंडियन्सने 30 लाखात ताफ्यात सामील करून घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. या 72 खेळाडूंवर एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आज कोणावर बोली लागणार आणि कोणत्या खेळाडूवर किती पैसे लागणार हे जाणून घेऊयात. 

25 Nov 2024, 18:47 वाजता

IPL Auction 2025 Live: इशांत शर्मा खेळणार गुजरातकडून 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: भारताचा महान वेगवान गोलंदाज इशांत शर्माला गुजरात टायटन्सने ७५ लाख रुपयांना विकत घेतले.

 

 

25 Nov 2024, 18:42 वाजता

IPL Auction 2025 Live: गुजरात टायटन्सने साई किशोरवर आरटीएमचा वापर केला

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  गुजरात टायटन्स संघाने आर साई किशोरला 2 कोटी रुपयांमध्ये आरटीएम केले आहे. पंजाब किंग्जने त्याच्यासाठी 2 कोटींची बोली लावली होती. त्याची मूळ किंमत फक्त 75 लाख रुपये होती.

 

 

25 Nov 2024, 18:38 वाजता

IPL Auction 2025 Live: विल जॅकला  MI घेतले तर उमरझाईला PBKS ने घेतले विकत 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  इंग्लंडचा स्फोटक फलंदाज विल जॅकला मुंबई इंडियन्सने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले. RCB ने जॅकसाठी RTM चा वापर केला नाही. अफगाणिस्तानचा अष्टपैलू अजमतुल्ला उमरझाईला पंजाब किंग्जने २.४० कोटी रुपयांना विकत घेतले.

25 Nov 2024, 18:34 वाजता

IPL Auction 2025 Live: CSK ने दीपक हुडाला विकत घेतले

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: लखनौ सुपर जायंट्सचा माजी खेळाडू आणि भारतीय संघाचा शतकवीर दीपक हुडा याला चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले. चेन्नईने दीपक हुडाला 1.70 कोटी रुपयांना खरेदी केले. लखनऊने त्यांच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही.

25 Nov 2024, 18:29 वाजता

IPL Auction 2025 Live: टीम डेव्हिड 3 कोटींना विकला गेला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  ऑस्ट्रेलियन अष्टपैलू टीम डेव्हिडला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तो त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपयांसाठी उपलब्ध होता.

25 Nov 2024, 18:27 वाजता

IPL Auction 2025 Live: मनीष पांडे 75 लाखांना विकला गेला 

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  भारताचा स्टार फलंदाज मनीष पांडेला कोलकाता नाईट रायडर्स संघाने 75 लाख रुपयांना खरेदी केले आहे. मनीष पांडे या आधी आयपीएल २०२४ मध्ये केकेआरचा एक भाग होता.

25 Nov 2024, 18:14 वाजता

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates:  नुकत्याच झालेल्या राउंडमध्ये हे खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत 

  • स्वास्तिक चिकारा-अनसोल्ड
  • अनुकूल रॉय-अनसोल्ड
  • हार्विक देसाई- अनसोल्ड
  •  मयंक डागर- अनसोल्ड
  • माधव कौशिक-अनसोल्ड
  • पुष्कराज मान- अनसोल्ड
  • अरावलिन अवनीश- अनसोल्ड
  • वंश बेदी- अनसोल्ड
  • साकिब हुसेन- अनसोल्ड
  • विद्वत कावरप्पा- अनसोल्ड
  • राजन कुमार- अनसोल्ड
  • प्रशांत सोळंकी- अनसोल्ड
  • जाटवेद सुब्रमण्यम- अनसोल्ड

25 Nov 2024, 18:01 वाजता

IPL Auction 2025 Live: शेख रशीद झाला चेन्नईत सामील

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्ज संघाने शेख रशीदचा आपल्या संघात समावेश केला आहे. गेल्या सिजनमध्येही तो चेन्नई संघाचा भाग होता. चेन्नई सुपर किंग्जने त्याला 30 लाख रुपये दिले.

25 Nov 2024, 17:53 वाजता

IPL Auction 2025 Live: हे खेळाडू राहिले अनसोल्ड

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: पुष्कराज मान, माधव कौशिक आणि मयंक डागर यांना  कोणताही खरेदीदार मिळाला  नाही.

 

25 Nov 2024, 17:52 वाजता

IPL Auction 2025 Live: शुभम दुबे

Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: शुभम दुबेला राजस्थानने 80 लाखांना खरेदी केले.