Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली. या 72 खेळाडूंवर एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता आज कोणावर बोली लागणार आणि कोणत्या खेळाडूवर किती पैसे लागणार हे जाणून घेऊयात.
25 Nov 2024, 12:38 वाजता
कोणत्या संघाकडे किती पैसे उरले आहेत?
Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: काही फ्रँचायझींनी पहिल्या दिवशी खुलेपणाने पैसे खर्च केले आहेत. तर, काही फ्रँचायझींनी जास्त बोली लावली नाही. आता याच फ्रँचायझी दुसऱ्या दिवशी कमाल करू शकतात. चला कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक आहेत ते जाणून घ्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 30.65 कोटी रुपये
मुंबई इंडियन्स - 26.10 कोटी रुपये
पंजाब किंग्स - 22.50 कोटी रुपये
गुजरात टायटन्स - 17.50 कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स - 17.35 कोटी रुपये
चेन्नई सुपर किंग्स - 15.60 कोटी रुपये
लखनौ सुपर जायंट्स – 14.85 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स - 13.80 कोटी रुपये
कोलकाता नाइट रायडर्स - 10.05 कोटी
सनरायझर्स हैदराबाद – 5.15 कोटी रुपये
25 Nov 2024, 12:04 वाजता
दुसऱ्या दिवशी 'या' मोठ्या खेळाडूंचे भवितव्य पणाला!
Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: पहिल्या दिवशी ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला तर श्रेयस अय्यरलाही भरगोस पैसे मिळाले. यःशिवाय कोलकाताने व्यंकटेश अय्यरसाठी आपली तिजोरी उघडली. दुसऱ्या दिवशीही असाच प्रकार अपेक्षित आहे. दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर कुमार, केन विल्यमसन, फाफ डू प्लेसिस, डॅरिल मिशेल, दीपक चहर, सॅम कुरन, मार्को जॅनसेन, कृणाल पांड्या या खेळाडूंवर लक्ष असेल.
Day of the #TATAIPLAuction
Here's how the Squads stack up
What do we have in store on Day today#TATAIPL pic.twitter.com/m0OM3zXooz
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
25 Nov 2024, 11:28 वाजता
मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी 'हे' खेळाडू ठरले सर्वात महागडे
Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: पहिल्या दिवशी पाच खेळाडूंवर सर्वात महागडी बोली लावण्यात आली.
- ऋषभ पंत - लखनौ - 27 कोटी - 2 कोटी (बेस किंमत)
- श्रेयस अय्यर - पंजाब - 26.75 कोटी - 2 कोटी (बेस किंमत)
- व्यंकटेश अय्यर- कोलकाता - 23.75 कोटी - 2 कोटी (बेस किंमत)
- अर्शदीप सिंग - पंजाब - 18 कोटी - 2 कोटी (बेस किंमत)
- युझवेंद्र चहल - पंजाब - 18 कोटी - 2 कोटी (बेस किंमत)
Presenting the Buys at the end of Day of the Mega Auction!
Which one did you predict right and which one surprised you the most
Let us know in the comments below #TATAIPLAuction | #TATAIPL pic.twitter.com/sgmL8tbI86
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
25 Nov 2024, 10:54 वाजता
लिलावाच्या पहिल्याच दिवशी आयपीएलच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत
Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: पहिल्याच दिवशी 3 खेळाडूंवर एवढा पैसा बरसला की आयपीएलच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत निघाले. हे तीन खेळाडू म्हणजे यष्टिरक्षक ऋषभ पंत, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू व्यंकटेश अय्यर. पंतला लखनौ सुपर जायंट्सने (एलएसजी) २७ कोटींची बोली लावून खरेदी केले. अशा प्रकारे पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
Snippets of how that Historic bidding process panned out for Rishabh Pant #TATAIPLAuction | #TATAIPL | @RishabhPant17 | @LucknowIPL | #LSG pic.twitter.com/grfmkuCWLD
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
25 Nov 2024, 10:26 वाजता
दुसऱ्या दिवशी कोणते खेळाडू उतरणार मेगा लिलावाच्या रिंगणात?
Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: दुसऱ्या दिवशी फाफ डु प्लेसिस, ग्लेन फिलिप्स, सॅम कुरन, केन विल्यमसन, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लॉकी फर्ग्युसन, टीम डेव्हिड, विल जॅक, नवीन उल हक, स्टीव्ह स्मिथ, नितीश यांसारखे मोठे खेळाडू. राणा आणि अजिंक्य रहाणे लिलावात उतरतील.
25 Nov 2024, 09:56 वाजता
दुसऱ्या दिवशी 10 संघ 173 कोटी रुपयांना विकत घेणार 'इतके' खेळाडू
Indian Premier League Mega Auction 2025 LIVE Updates: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 सिजनचा दोन दिवसीय मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे सुरू आहे. पहिल्या दिवशी (24 नोव्हेंबर) सर्व 10 संघांनी एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करून 72 खेळाडूंना खरेदी केले. आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी (25 नोव्हेंबर) लिलाव होणार आहे. दुसऱ्या दिवशी 132 खेळाडूंची विक्री होणार आहे. या खरेदी करण्यासाठी, सर्व 10 संघांच्या पर्समध्ये एकूण 173.55 कोटी रुपये शिल्लक आहेत.